

गोकुळ दूध संघावर मागील 25 ते 30 वर्षे मनपा आघाडीची सत्ता होती.
महादेवराव महाडिक, अरुण नरके आणि दिवंगत पी एन पाटील यांच्या नेतृत्वाखालील ही आघाडी आता तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे.
सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे गोकुळमधील सत्तासमीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
kolhapur cooperative politics News : 'एक वेळ आमदारकी नको पण गोकुळचा संचालक करा', अशी कार्यकर्त्यांवर म्हणण्याची वेळ गोकुळ दूध संघातील मनपा आघाडीने आणली होती. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून याच मनपा आघाडीने गोकुळ दूध संघाला पश्चिम महाराष्ट्र बरोबर पुणे मुंबईत घरोघरी पोहोचवले. याच आघाडीने मागील 25 वर्ष गोकुळ दूध संघावर सत्ता भोगली. मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत ही आघाडी एकत्र राहिली. पण सध्याची राजकीय परिस्थितीत गोकुळमधील मनपा आघाडी तुटल्यात जमा आहे. ही आघाडी म्हणजे माजी आमदार महादेवराव महाडिक, अरुण नरके आणि दिवंगत आमदार पी एन पाटील यांची.
मागील वर्षी गोकुळची निवडणूक ही राज्यात गाजली. गेल्या 25 वर्षांपासून गोकुळ दूध संघामध्ये असणारी माजी आमदार महादेवराव महाडिक, अरुण नरके आणि दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या सत्तेला काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुरुंग लावला. तत्कालीन महाविकास आघाडी सरकार म्हणून काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील हे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना एकत्र आणण्यात यशस्वी झाले.
यानंतर गोकुळच्या राजकारणात पहिल्यांदाच राज्यस्तरावरून दबाव आणल्याचा आरोप महायुतीच्या नेत्यांनी आमदार पाटील यांच्यावर केला होता. मात्र तत्कालीन विद्यमान आमदार पी. एन. पाटील हे काँग्रेसचे असताना देखील कोणत्याही दबावाला बळी न पडता गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक, अरुण नरके यांच्यासोबत राहिले होते. निवडणुकीनंतर आमदार सतेज पाटील आणि मंत्री मुश्रीफ यांनी सत्ता मिळवली असली तरी महाडिक नरके आणि पाटील गटाने एकत्र आघाडी करत आपापले उमेदवार विजयी केले होते.
तत्कालीन वेळी दिवंगत नेते पी. एन. पाटील सांगरूळ विधानसभा निवडणुकीत, अरुण नरके गोकुळ दूध संघात अध्यक्ष आणि महाडिक कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात सक्रिय होते. जिल्ह्यातील राजकारणावर पकड निर्माण झाल्याने तिघांमध्ये घट्ट मैत्री होती. शिवाय तिघांच्या घट्ट मैत्रीमुळे जिल्ह्याच्या राजकारणावर पकड निर्माण केली होती.
मात्र गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर अरुण नरके यांचे नेतृत्व संचालक म्हणून चेतन नरके यांच्याकडे गेले. लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार चेतन नरके यांनी केल्यानंतर अरुण नरके आणि दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्यात फेब्रुवारी 2023 ला चर्चा होऊन पाठींब्याचा निर्णय झाला. मात्र लोकसभा निवडणुकीतील माघार घेऊन काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना चेतन नरके यांनी पाठिंबा दिला. तेव्हापासून ते आजपर्यंत चेतन नरके हे नेहमीच काँग्रेसने आमदार सतेज पाटील यांच्या सोबत राहिले. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत देखील नरके हे सतेज पाटील यांच्या सोबतच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर महिन्या भरातच दिवंगत आमदार पी एन पाटील यांचं दुर्दैवी निधन झालं. त्यांचे राजकीय वारसदार म्हणून माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील हे सध्या महायुतीत असले तरी मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत असणार आहेत. त्यामुळे आता याच मनपा आघाडीतील माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे राजकीय वारसदार म्हणून अमल महाडिक, शोमिका महाडिक यांच्या हातात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची धुरा आहे. मागील निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही एकत्र लढली.
मात्र आता हीच निवडणूक महायुती म्हणून भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहे. तर काँग्रेस, ठाकरे गट हा महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्यामुळे महायुती म्हणून आता महाडिक गटाकडे मंत्री आबिटकर, मंत्री मुश्रीफ, आमदार चंद्रदिप नरके हे नवे सहकारी सोबत असणार आहेत. तर आमदार सतेज पाटील यांच्याबरोबर चेतन नरके असणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत ही मनपा आघाडी संपुष्टात आल्याचे चित्र आहे.
1. मनपा आघाडी म्हणजे कोणाची आघाडी आहे?
माजी आमदार महादेवराव महाडिक, अरुण नरके आणि दिवंगत पी एन पाटील यांच्या नेतृत्वाखालील गट ही मनपा आघाडी म्हणून ओळखली जाते.
2. गोकुळ दूध संघावर किती वर्षे या आघाडीची सत्ता होती?
गेल्या सुमारे 25 ते 30 वर्षांपासून या आघाडीने गोकुळ दूध संघावर सत्ता राखली होती.
3. आघाडी तुटण्याचे कारण काय आहे?
सध्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे अंतर्गत मतभेद वाढल्याची चर्चा आहे.
4. याचा गोकुळ दूध संघावर काय परिणाम होऊ शकतो?
सत्तासमीकरण बदलल्यास व्यवस्थापन आणि धोरणांमध्ये मोठे बदल होऊ शकतात.
5. आगामी निवडणुकीवर याचा परिणाम होईल का?
होय, आघाडी फुटल्यास आगामी निवडणुकीत वेगवेगळी गटबाजी दिसू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.