

Prashant Jagtap: पुण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची विधान परिषदेची निवडणूक आता बिनविरोध होणारा आहे. कारण महाविकास आघाडीकडून देण्यात आलेल्या उमेदवाराने माघार घेतली आहे. महाविकास आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडण्यात आली होती. याप्रकारामुळं काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली असून शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. T
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून श्रीकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, अखेरच्या क्षणी श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार विक्रम काकडे हे बिनविरोध निवडून येणार आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या या निर्णयामुळे काँग्रेस मोठ्या प्रमाणात नाराज झाली असल्याचे समोर आला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत बोलताना प्रशांत जगताप म्हणाले, "पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकूणच जे काही विरोधक आहेत, त्यांची भाजप किंवा महायुती सरकारच्या विरोधात लढण्याची तयारी होती. इथं आमच्या काँग्रेस पक्षाचा आकडा हा सगळ्यात मोठा होता. काँग्रेस पक्षाने या जागेवर दावा केला होता. प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी सुद्धा या संदर्भात आमची चर्चा झाली होती. पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने पुण्याच्या जागेवर दावा केला आणि महाराष्ट्रातल्या १७ जागेमध्ये फक्त आम्हाला दोनच जागा द्या, असं आम्हाला सांगितलं. यामध्ये पुणे आणि साताऱ्याच्या जागेची मागणी करण्यात आली, अशा प्रकारे मागणी केल्यामुळे काँग्रेस पक्षाने या ठिकाणी मोठ्या मनाने या ठिकाणी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला सोडली.
तरी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष यापेक्षा काँग्रेस पक्षाच्या मतदारांची संख्या जास्त होती त्यामुळे आम्हालाही जागा हवी होती. पण दुर्दैवाने या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने याच्यामध्ये आग्रही भूमिका घेतली. तर काँग्रेस पक्षाने या ठिकाणी मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाला सोडली.
मात्र, पुण्यात आम्हाला धोका मिळाला आहे. ही जागा लढवून आम्ही भाजपच्या विरोधामध्ये लढत आलोय हा संदेश मतदारांना देणार होतो. पण दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवर फॉर्म भरला आणि आज तो अखेर माघारी सुद्धा घेतला. हा आमचा एक विश्वासघात आहे. काँग्रेस पक्षाचा हा विश्वासघात झाला आहे असं आम्ही मानतो असं प्रशांत जगताप म्हणाले.
त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये काँग्रेस आपल्या स्वबळावर लढण्याचा नारा निश्चित देईल. कारण अशा प्रकारे जर भाजपला किंवा महायुतीला कोणी सरेंडर होण्याची भूमिका घेत असेल, तर हा मतदारांचा विश्वासघात आहे. या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या किंवा शिवसेनेच्या उमेदवारांच्या पेक्षा काँग्रेस पक्ष हा स्वबळावर लढण्याची भूमिका घेईल. आजचा झालेला हा विश्वासघात हा निश्चित मतदारांचा आहे. आमच्यापेक्षा मतदारांमध्ये संतप्त भावना ही जास्त आहे असं प्रशांत जगताप म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.