Maan Dhangar Community Andolan : पालकमंत्र्यांची विनंती उपोषणकर्त्यांनी धुडकावली; सोमवारी माण तालुका बंदची हाक

Dahiwadi Tahashil Office धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी दहिवडी येथील तहसील कार्यालयासमोर सुरु असलेल्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे.
Maan Dhangar community Andolan
Maan Dhangar community Andolansarkarnama
Published on: 
Updated on: 

-रूपेश कदम

Maan Dhangar Community Andolan : उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घ्यावे ही पालकमंत्र्यांनी पत्राद्वारे केलेली विनंती उपोषणकर्त्यांनी धुडकावून लावली. तसेच सायंकाळी प्रशासनाशी झालेली चर्चा सुध्दा निष्फळ ठरली. त्यामुळे सोमवारी माण तालुका बंदची हाक देवून आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय सकल धनगर समाजाने घेतला आहे.

धनगर समाजाला Dhangar Reservation अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी दहिवडी तहसील कार्यालयासमोर सकल धनगर समाजाचे उपोषण सुरू असून आंदोलनाचा आजचा सहावा दिवस होता. आज दुपारी पालकमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांचे पत्र उपोषणकर्त्यांना देवून उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली.

मात्र हे पत्र हे धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याचे मत उपोषणकर्त्यांसह समाजाने व्यक्त केले. या पत्रात सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे झालेल्या बैठकीचा वृत्तांत होता. आमची मागणी अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याची नसून असलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची आहे, हे त्यांनी समजून घेणे गरजेचे आहे.

पालकमंत्र्यांनी आमची बोळवण करण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या तोंडाला पाने पुसण्याचा जो प्रकार केला आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. पालकमंत्र्यांच्या असंवेदनशील वर्तनाबद्दल तीव्र संताप व्यक्त करुन पालकमंत्री सातारा वरुन दहिवडीला येवू शकत नसतील तर त्यासारखे दुसरे दुर्दैव नाही, अशा शब्दात सकल धनगर समाजाने संताप व्यक्त केला.

Maan Dhangar community Andolan
Maan News : उपोषण सोडण्यासाठी पालकमंत्री नको मुख्यमंत्र्यांनीच यावे : धनगर समाज आक्रमक

त्यानंतर सायंकाळच्या सुमारास आमदार जयकुमार गोरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलंडे, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. मात्र उपोषणकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने ही चर्चा निष्फळ ठरली. एकंदरीत सरकारची भूमिका समाजाप्रती सकारात्मक नसल्याने आता आपल्याला आंदोलनाची धग वाढविण्याची गरज असल्याची भूमिका सकल धनगर समाजाने घेतली आहे.

उद्या रविवारी पालकमंत्र्यांनी दहिवडीत येवून उपोषणकर्त्यांची भेट घेतली नाही तर, माण तालुका बंद करुन येथील फलटण चौकात ठिय्या आंदोलन करण्यात निर्णय घेण्यात आला. तसेच त्यानंतर तहसीलदार कार्यालयासमोर आत्मदहन करणे, विष प्राशन करणे, रस्त्यावर चूल मांडणे, चक्का जाम करणे अशा विविध पध्दतीने आंदोलनाची धग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

Edited By Umesh Bambare

Maan Dhangar community Andolan
Maan Political News : पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण का दिले नाही : काँग्रेस नेत्याचा फडणवीसांना सवाल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.