Sawant Brother : शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर उघड हल्ला; ‘जो स्वतःच्या भावाची चौकशी करू शकत नाही; तो गावाची काय चौकशी करणार’

Solapur Flood Update News : सोलापूर जिल्ह्यातील 124 गावांना पुराचा फटका बसला होता. वाकाव येथील घर पाण्यात बुडाल्यानंतरही तानाजी सावंत यांनी चौकशी केली नाही, असा आरोप भावाने करून नाराजी व्यक्त केली.
Tanaji Sawant-Shivaji Sawant
Tanaji Sawant-Shivaji SawantSarkarnama
Published on
Updated on
  1. सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यात १२४ गावे बाधित झाली, त्यात माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे वाकाव येथील घरही दोन दिवस पाण्यात होते.

  2. तानाजी सावंत यांनी या काळात आपल्या भावाशी संपर्क न ठेवल्याने बंधू शिवाजी सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आणि “जो स्वतःच्या भावाची चौकशी करत नाही तो गावाची काय करणार” असा टोलाही लगावला.

  3. शिवाजी सावंत यांनी पूरग्रस्तांना २५ हजार रुपये व ५० किलो धान्य मदतीची मागणी केली, तसेच धरणातील पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे महापूर आल्याचा आरोप केला.

Solapur, 28 September : सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 124 गावे बाधित झाली होती. अनेक घरांत पाणी शिरले होते. माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांचे माढा तालुक्यातील वाकाव येथील घरही दोन दिवस पाण्यात होते. या काळात तानाजी सावंत यांनी आम्हाला साधा फोनही केला नाही. जो स्वतःच्या भावाची चौकशी करू शकत नाहीत, ते गावाची काय चौकशी करणार, असा सवाल करून शिवाजी सावंत यांनी माजी मंत्री तानाजी सावंतांच्या भूमिकेबाबत अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली.

सावंत कुटुंबीयांचे माढा तालुक्यातील वाकाव येथे घर आहे. आतापर्यंत या ठिकाणी सर्व सावंत कुटुंबीय एकत्र यायचे. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीपासून सावंत कुटुंबात फूट पडली असून तानाजी सावंत वाकावकडे आलेले नाहीत. तसेच, शिवाजी सावंत (Shivaji Sawant) यांनीही शिवसेनेच्या जिल्हासंपर्कप्रमुखपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सावंत कुटुंबीयांतील मतभेद पुराच्या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

शिवाजी सावंत म्हणाले, आमचे संपूर्ण घर पाण्यात असताना माजी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा आणि माझा काहीही संपर्क झालेला नाही. त्यांनी मला फोनही केलेला नाही. त्यांनी फोन करून आमची चौकशी करावी, अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षाही नाही.

तानाजी सावंत यांचा जन्म माढा तालुक्यातील वाकावमध्ये झालेला आहे. पण जो स्वतःच्या भावाची चौकशी करू शकत नाहीत, तो गावाची काय चौकशी करणार आहे. हे गंभीर आहे की नाही, हे त्याच्या त्याला माहिती, मला माहिती नाही, असा टोलाही त्यांनी बंधू तानाजी सावंतांना लगावला.

शिवाजी सावंत म्हणाले, गेल्या 60 ते 65 वर्षांत इतक्या मोठ्या प्रमाणात महापूर कधी आला नव्हता. या पावसाळ्यात ढगफुटीसारख्या घटना अनेकदा घडल्या आहेत. सीना कोळेगाव धरणाच्या पाण्याचे नियोजन झाले नव्हते. धरण 80 ते 90 टक्के भरल्यानंतर पाणी थोडं थोडं सोडून पाण्याचे नियोजन करावं लागतं. पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यायला पाहिजे होती.

Tanaji Sawant-Shivaji Sawant
Eknath Shinde : खासदार बारणेंना बाहेर थांबवून एकनाथ शिंदे अन्‌ राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी यांच्यात बंद दाराआड तासभर चर्चा

अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात सीना कोळेगाव धरणात आले. धरणातील अगोदरच शंभर टक्के असलेला साठा यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी खाली सीना नदीत आले. चांदणी, खासापुरी धरणातील पाणी आणि परिसरातील पडलेला पाऊस यामुळे सीना नदीत मोठ्या प्रमाणात पाणी आले आणि ही पूरस्थिती उद्‌भवली, असेही महापुराचे कारण शिवाजी सावंत यांनी सांगितले.

‘पूरग्रस्तांना 25 हजार अन्‌ 50 किलो धान्य द्या’

सावंत म्हणाले, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो, महापुरामुळे जे लोक उद्‌ध्वस्त झाले आहेत, त्यांना तातडीने मदत करण्यात यावी. घरातील सर्व चीजवस्तू वाहून गेल्याने मिळणाऱ्या पाच हजार रुपयांची मदत तुटपुंजी आहे. एका कुटुंबात चार ते पाच लोक असतात, त्यांना पाच हजार रुपयांमध्ये काहीही होत नाही. पूरग्रस्तांना कमीत कमी 25 हजार रुपये आणि 50 किलो धान्य सरकारने द्यावे, अशी विनंती मी सरकारला करतो.

Tanaji Sawant-Shivaji Sawant
Chhagan Bhujbal : पावसाने मोठे नुकसान, मुंबई दौरा रद्द करत भुजबळांची येवल्याकडे धाव
  1. महापुरामुळे किती गावे बाधित झाली?
    उ: तब्बल १२४ गावे प्रभावित झाली.

  2. प्र: सावंत कुटुंबातील मतभेदाचे कारण काय आहे?
    उ: विधानसभा निवडणुकीपासून कुटुंबात फूट पडली असून तानाजी सावंत वाकावला येत नाहीत, तसेच शिवाजी सावंत भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत.

  3. प्र: शिवाजी सावंत यांनी सरकारकडे कोणती मागणी केली?
    उ: पूरग्रस्तांना किमान २५ हजार रुपये आर्थिक मदत व ५० किलो धान्य देण्याची विनंती.

  4. प्र: महापुराचे मुख्य कारण काय सांगितले गेले?
    उ: सीना कोळेगाव धरणातील पाण्याचे योग्य वेळी नियोजन न होणे आणि अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com