Satara Politic's : पवारांचे निकटवर्तीय शशिकांत शिंदेंना शिवेंद्रसिंहराजेंचा दे धक्का; कट्टर समर्थकाचा भाजपमध्ये प्रवेश

Shashikant Shinde Supporter join BJP : कट्टर समर्थक आणि बाजार समितीच्या विद्यमान उपसभापती हेमंत शिंदे यांच्या भाजप प्रवेशामुळे जावळीतून शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे.
Shashikant Shinde-Shivendraraje Bhosale
Shashikant Shinde-Shivendraraje BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Satara, 08 September : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा भाजप नेते शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार शशिकांत शिंदे यांना जोरदार धक्का दिला आहे. आमदार शशिकांत शिंदे यांचे निकटवर्तीय जावळी-महाबळेश्वर शेती उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हेमंत शिंदे यांनी शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये समावेश केला आहे.

आमदार शिंदे यांचे कट्टर समर्थक तसेच जावळी-महाबळेश्वर शेती उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हेमंत शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला (NCP SP) मोठा धक्का मानला जात आहे.

जावळी-महाबळेश्वर शेती उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जावळी तालुका उपाध्यक्ष धनंजय पोरे, गौरव शिंदेसह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

कट्टर समर्थक आणि बाजार समितीच्या विद्यमान उपसभापती हेमंत शिंदे यांच्या भाजप प्रवेशामुळे जावळीतून शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत हेमंत शिंदे यांनी पक्ष सोडणे शशिकांत शिंदे यांना मोठे अडचणीचे ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Shashikant Shinde-Shivendraraje Bhosale
Gokul Dudh Sangh : शौमिका महाडिकांनी वार्षिक सभेपूर्वी मांडली भूमिका; ‘गोकुळचे अध्यक्ष माझ्या माहेरचे, माझ्या भावाप्रमाणे; पण...’

भाजप प्रवेशानंतर हेमंत शिंदे यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आगामी काळात सर्वतोपरी ताकद दिली जाईल. भारतीय जनता पक्षात सर्वांना सन्मानाने वागविले जाईल, अशी ग्वाही दिली आहे. खंदा समर्थक फोडून शिवेंद्रसिंहराजेंनी शशिकांत शिंदेंना मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे.

Shashikant Shinde-Shivendraraje Bhosale
Vice President Election : उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील ‘क्रॉस व्होटिंग’च्या चर्चेवर श्रीकांत शिंदेंचा मोठा दावा; म्हणाले ‘NDAच्या नंबरपेक्षा....’

जावळीत भाजपची ताकद हेमंत शिंदे यांच्या पक्ष प्रवेशाने नक्कीच वाढेल. त्यांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा योग्य सन्मान राखला जाईल, असे प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com