Jayshri Jadhav : शिवसेनेकडे मी उमेदवारी मागितली, पण मला दुसऱ्याचाच अर्ज भरायला बोलावलं; जयश्री जाधवांनी सांगितली आपबित्ती

Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची मी विद्यमान आमदार होते, त्यामुळे मला पुन्हा उभारण्याची संधी होती. पोटनिवडणुकीतील विजयानंतर मला विधानसभेत काम करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी मिळाला आहे. मला आणखी काम करायचं होतं.
Jayshree Jadhav
Jayshree JadhavSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur, 01 November : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसला धक्का देत आमदार जयश्री जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसकडून नेते सतेज पाटील यांनी ‘जाधव कुटुंबीय हे प्रतिष्ठित आहे. त्यांना हे अशुभनीय असून त्यांचा शिवसेना पक्षप्रवेश म्हणजे दुर्दैवी आहे,’ अशी टीका केली होती.

दरम्यान, माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलेल्या टीकेला आमदार जयश्री जाधव यांनी उत्तर दिलं आहे. त्यात त्यांनी आपण शिवसेनेत प्रवेश का केला?, याचं नेमकं उत्तर दिलं आहे. इतकचं नव्हे; तर महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची मी विद्यमान आमदार होते, त्यामुळे मला पुन्हा उभारण्याची संधी होती. पोटनिवडणुकीतील विजयानंतर मला विधानसभेत काम करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी मिळाला आहे. मला आणखी काम करायचं होतं. मी उमेदवारीची मागणीही केली होती. मात्र, त्यांनी मला थांबायला पाहिजे, असं सांगितलं होतं, असंही जयश्री जाधव यांनी नमूद केले.

Jayshree Jadhav
Solapur Election: मोदी, शहा, पवार, गांधींसह तेलुगू अभिनेतेही गाजवणार सोलापुरात विधानसभेचा आखाडा

कोणताही उमेदवार उभारला तरी त्यांच्या पाठीशी राहायचं, असं वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं आहे. राजू लाटकर यांना उमेदवारी मिळाल्याने सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्ही त्याला पाठिंबा दिला. मात्र, दुसऱ्याच दिवशी असं काय घडलं माहित नाही. केवळ दुसऱ्याचा उमेदवारी अर्ज भरायला बोलावण्यात आलं, अशी खंत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार जयश्री जाधव यांनी सांगितले.

Jayshree Jadhav
Baramati News : शरद पवार गोविंदबागेत तर अजित पवार काटेवाडीत दिवाळी पाडवा साजरा करणार

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत माझं शिवधनुष्य माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी उचललं होते. तसेच, माझ्यामागे माझ्या घराण्याने साथ दिली होती. मात्र, मला माझं काम थांबवायचं नव्हतं; म्हणून मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. मी आता महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. महायुतीप्रमाणेच मला राहावं लागेल. असेही जयश्री जाधव यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com