Shahaji Patil : मला वाटतंय मिटकरींनी संजय राऊतांना गुरू मानलंय... शहाजी बापूंचा टोला

भाजपनं BJP शिवसेना Shivsena फोडली म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसनं NCP अख्खी शिवसेना डब्यात घालायचं ठरवलं होतं, असा आरोप शहाजी बापू Shahaji Bapu यांनी केला.
Shahaji Patil, Amol Mitkari
Shahaji Patil, Amol Mitkarisarkarnama
Published on
Updated on

दहिवडी : अमोल मिटकरी हे पात्र राजकारणात नवं आहे. मला तर वाटतं मिटकरीनं संजय राऊत यांना गुरु मानलंय आणि त्यामुळे जे राऊतांचं झालं तेच एकदिवशी मिटकरीचं होणार, असा टोला आमदार शहाजी बापू पाटील यांनी मिटकरींना लगावला आहे.

विरकवाडी (ता. माण) येथे बैलगाडी शर्यतीच्या बक्षिस वितरणानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपने शिवसेना फोडून बेगडी राजकारण केलं, असं म्हणण्याचा जयंत पाटील यांना कोणताही नैतिक अधिकार नसून राष्ट्रवादीनेच शिवसेना अडचणीत आणली, असा घाणाघाती आरोप शहाजी बापू पाटील यांनी केला.

Shahaji Patil, Amol Mitkari
एकदम Ok : शहाजी बापू म्हणाले, जयाभाऊच भावी मंत्री...

श्री. पाटील म्हणाले, आमची व भाजपची युती नैसर्गिक होती. ही युती अडीच वर्षापूर्वीच मार्गी लागायला पाहिजे होती. परंतू दुर्देवाने त्यावेळी ती मार्गी लागली नाही. याला जबाबदार राष्ट्रवादी काँग्रेस आहे. भाजपनं शिवसेना फोडली म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसनं अख्खी शिवसेना डब्यात घालायचं ठरवलं होतं. ते एकनाथ शिंदे यांनी वाचवलं, त्याचा जळफळाट जयंत पाटील यांना होतोय.

Shahaji Patil, Amol Mitkari
एकनाथ शिंदेंनी कामाला लागावं, पुजा-अर्चा करण्यासाठी वेगळा मंत्री नेमावा- जयंत पाटील

आमदार शहाजी पाटील म्हणाले, अमोल मिटकरी हे पात्र राजकारणात अतिशय नवं आहे. मला तर वाटतं मिटकरीनं संजय राऊत यांना गुरु मानलंय आणि त्यामुळे जे राऊतांचं झालं तेच एकदिवशी मिटकरीचं होणार असा टोलाही त्यांनी मिटकरी यांना लगावला.

Shahaji Patil, Amol Mitkari
Satara : सातारा लोकसभेतून भाजपचाच खासदार निवडून येणार.. जयकुमार गोरे

दुसरं काश्मीर माणचं खोरं...

"काय होता तो आमचा दुष्काळी भाग, काय झालाय तो आता आमचा दुष्काळी भाग, काय होणार तो आमचा दुष्काळी भाग. हिरवंच हिरवं दुसरं काश्मीर माण खोरं."

-आमदार शहाजी पाटील

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com