BJP Conflict: भाजपाच्या आजी- माजी आमदारांची भांडणं मिटता मिटेना; आता चेंडू थेट मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

Ichalkaranji BJP Conflict, Chandrakant Patil, Suresh Halvankar: इचलकरंजी भाजपमधील हाळवणकर आणि आवाडे गटातील वाद चिघळला असून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
Ichalkaranji, Municipal Corporation; BJP Internal Dispute, BJP MLA Rahul Awade And Suresh Halvankar
Ichalkaranji, Municipal Corporation; BJP Internal Dispute, BJP MLA Rahul Awade And Suresh Halvankarsarkarnama
Published on
Updated on

Ichalkaranji BJP Conflict: इचलकरंजी भाजपमधील अंतर्गत संघर्ष टोकाचा बनत चालला असून निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्या आमदार आवाडे गटाच्या विरोधात माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचा गट आक्रमक झाला आहे. या अंतर्गत वर्चस्व वादामुळे दोन्ही गटांमधील मतभेद आता वरिष्ठ स्तरांवर पोहोचले असून, जुन्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे.

महापालिकेतील सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत वाद आणि आयुक्त पल्लवी पाटील यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत, हाळवणकर गटाच्या नगरसेवकांनी गुरुवारी कोल्हापुरात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर चुकांचा पाढा वाचला. आयुक्तांच्या मनमानी कारभाराबाबत तक्रारी मांडत त्यांच्या बदलीची मागणी यावेळी करण्यात आली.

Ichalkaranji, Municipal Corporation; BJP Internal Dispute, BJP MLA Rahul Awade And Suresh Halvankar
Kolhapur Politics : अंतर्गत वादामुळे महायुतीला तडे; मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात 'गोकुळ'मध्ये न्याय होता होता 'केडीसी'तही आग धुमसणार

नगरसेविकांनी आयुक्त पाटील यांच्याकडून मिळणारी अवमानकारक वागणूक, सभेतील वर्तन आणि संवादाची चुकीची पद्धत याविषयीच्या तीव्र भावना मंत्र्यांसमोर मांडल्या. त्यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेत गट-तट न करता एकत्रित काम करण्याचा सल्ला देत आयुक्तांना समज दिली जाईल, असे स्पष्ट केले.

आवाडे गटाकडून होत असलेल्या मुस्कटदाबीची कैफीयत मांडल्यानंतर हा विषय पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'वर्षा' निवासस्थानी बैठक आयोजित केली जाईल, अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली. तसेच, आवाडे यांच्याशी चर्चा करून दोन्ही गटांमधील संघर्ष मिटवण्यासाठी समिती स्थापन करून समन्वय राखला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Ichalkaranji, Municipal Corporation; BJP Internal Dispute, BJP MLA Rahul Awade And Suresh Halvankar
Awade-Halvankar political clash : कचरा संकलनाच्या 22 कोटींच्या बजेटवरून ठिणगी; आवाडे-हाळवणकर गट पुन्हा आमनेसामने!

दरम्यान, या संपूर्ण घडामोडींनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी इचलकरंजीमधील हे मतभेद म्हणजे केवळ पेल्यातील वादळ असल्याचे स्पष्ट केले, तर दुसरीकडे हाळवणकर आणि आवाडे गटातील हा संघर्ष आता थेट मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात जात असल्याची चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com