Awade-Halvankar political clash : कचरा संकलनाच्या 22 कोटींच्या बजेटवरून ठिणगी; आवाडे-हाळवणकर गट पुन्हा आमनेसामने!

Awade Halvankar group political clash : कचरा संकलनासाठीच्या 22 कोटी रुपयांच्या बजेटवरून आवाडे आणि हाळवणकर गटांमध्ये पुन्हा वाद पेटला आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण आणि ताज्या घडामोडी.
Kolhapur Municipal Corporation
Kolhapur Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

कचरा संकलनाच्या 22 कोटी अंदाजपत्रकाच्या मंजुरीचा विषय आज महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत नऊ विरुद्ध सहा मतांनी नामंजूर करण्यात आला. त्यामुळे सत्तारूढ भाजपवर मोठी नामुष्की ओढवली. यामध्ये भाजपमधील हाळवणकर गटाला विरोधकांची साथ मिळाली. तर आवाडे गट एकाकी पडला.

स्थायी समितीच्या सभेतील घडामोडीचे महापालिका राजकारणात पुढील काळात मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने सत्तारूढ भाजपमधील आवाडे - हाळवणकर गटातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. यामुळे आता उघडपणे गटबाजीला उधाण येण्याची भीती अधिक आहे. अशा परिस्थितीत दोन्ही गटांच्या नेत्यांचा कस लागणार आहे.

Kolhapur Municipal Corporation
IAS Officer : मंत्र्याशी पंगा! मुख्यमंत्र्यांकडे तक्रार गेल्याने राजकारणही तापलं; कोण आहे IAS जॉन किंग्जली?

इंदूर शहराच्या धर्तीवर स्वच्छता करण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार शहरातील कचरा संकलनासह विविध कामांचे २२ कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक प्रशासनाकडून तयार केले आहे. स्थायी समितीच्या गेल्या सोमवारच्या सभेत अंदाजपत्रक मंजुरीसाठी सादर केले होते; पण, काही सदस्यांनी अभ्यास करण्यास वेळ न मिळाला नसल्याचे कारण दिले. त्यामुळे सभा तहकूब करण्यात आली होती.

पुन्हा आज दुपारी १२.१५ वाजता सभापती सतीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. सभेसमोर हा विषय मंजुरीसाठी आल्यानंतर वादळी चर्चेला सुरुवात झाली. हाळवणकर गटातील नगरसेवकांनी एकत्रित अंदाजपत्रक न करता वेगवेगळे करण्याची मागणी केली. तसेच हे अंदाजपत्रक वाढविण्यात आल्याचा जोरदार आक्षेप घेतला. याबाबत हाळवणकर गटातील नगरसेवकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी हा विषय नामंजूर करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार विषय मंजुरीच्या विरोधात ठराव दाखल केला.

भाजपमध्ये नवा-जुना हा वाद नवीन नाही. विविध कारणांमुळे हा वाद सतत चर्चेत येत असतो. यातूनच काही दिवसांपूर्वी हाळवणकर गटाकडून माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला होता. त्याची जोरदार चर्चा अगदी मंत्रालयापर्यंत धडकली होती. महापालिका निवडणूक झाल्यानंतर पदाधिकारी वाटपावेळीही दोन्ही गटांत वाद निर्माण झाला होता. त्यावर सामोपचाराने मार्ग काढण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून भाजप अंतर्गत दोन्ही गटांत धुसफूस सुरू होती. त्याचे उघड प्रदर्शन होत नव्हते; पण समाज माध्यमातून एकमेकांचे समर्थक भिडत होते.

Kolhapur Municipal Corporation
Double Decker Bus : पुणेकरांसाठी मोठी बातमी: शहरात पुन्हा धावणार 'डबलडेकर'; या 10 मार्गांवर लवकरच होणार ट्रायल

स्थायी समिती सभेतील आजच्या घडामोडीमुळे पुन्हा एकदा महापालिकेचे राजकारण ढवळून निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विरोधकांची संख्या तुलनेने कमी असताना ते सतत सत्तारूढ गटावर सातत्याने भारी पडत आहेत. सत्तारूढ गटाकडून त्यांना ताकदीने उत्तर देण्याची यंत्रणा अद्याप सक्षम नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच आज स्थायी समितीच्या सभेत सत्तारूढ गटातील काही जणांनी विरोधकांशी हातमिळावणी केली. त्यामुळे विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे. पक्षांतर्गत मतभेद वेळीच मिटविण्याची आवश्यकता आहे. अन्यथा, पक्षातील वाढती गटबाजी ही पुढील काळात नेतेमंडळींसाठी अधिक त्रासदायक ठरण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com