Akkalkot Result : अक्कलकोटमध्ये कल्याणशेट्टी, म्हेत्रे, तानवडेंच्या कुटुंबातील पाच जण विजयी; दोन माजी आमदारांच्या वारसांना अपयश

Zilla Parishad-Panchayat Samiti Result : अक्कलकोट तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विविध नेत्यांच्या कुटुंबीयांनी विजय मिळवत सोलापूर जिल्ह्यात घराणेशाही जनतेने स्वीकारल्याचे चित्र स्पष्ट झाले.
Akkalkot Result
Akkalkot ResultSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 09 February : अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू आणि पत्नी, तर माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांचा मुलगा आणि मुलगी, तर माजी आमदार बाबासाहेब तानवडे यांचे पुतणे यांनी विजय मिळविला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह अक्कलकोट तालुक्यातील घराणेशाही जनतेने स्वीकारल्याचे स्पष्ट होते.

अक्कलकोट तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सहा, तर पंचायत समितीच्या १२ जागा आहेत. त्यातील जिल्हा परिषदेच्या चार, तर पंचायत समितीच्या आठ जागा भाजपने जिंकल्या आहेत, त्यामुळे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी तालुक्यावर पुन्हा एकदा वर्चस्व राखले आहे. शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी जिल्हा परिषदेच्या दोन, तर पंचायत समितीच्या चार जागांवर यश मिळाले आहे.

अक्कलकोट तालुक्यात सिद्धराम म्हेत्रे, (स्व) महादेवराव पाटील, (स्व) बाबासाहेब तानवडे, (स्व) सिद्रामप्पा पाटील या माजी आमदारांच्या, तर विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वारसांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढवली. त्यात कल्याणशेट्टी, म्हेत्रे, तानवडे यांच्या वारसदारांची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत एन्ट्री झाली आहे. मात्र, सिद्रामप्पा पाटील यांचे वारसदार शिवानंद पाटील यांना आपले प्रतिनिधी निवडून आणण्यात अपयश आले आहे.

अक्कलकोट तालुक्याची ही निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची आणि संघर्ष निर्माण करणारी ठरली. भाजपकडून आनंद तानवडे यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी ऐनवेळी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यांनी आपले बंधू प्रवीण दत्तात्रय तानवडे यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभे केले. त्यांच्यासह शिरवळ गणातील पंचायत समिती सदस्यसुद्धा निवडून आणण्यात त्यांना यश आले.

Akkalkot Result
Indapur Result : इंदापुरात मामा-भाच्याची दुसरी पिढी झेडपीत; कृषिमंत्री भरणेंच्या मुलाची पंचायत समितीत एन्ट्री!

चपळगाव, पानमंगरूळ येथील गट आणि गणातील एकतर्फी निकाल वगळता जेऊर, नागणसूर येथे उमेदवारांना विजयासाठी तीव्र संघर्ष करून शेवटपर्यंत झुंजावे लागले. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी या चपळगाव गटातून, त्यांचे बंधू सागर कल्याणशेट्टी यांनी चपळगाव गणातून विजय मिळविला.

माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचे चिरंजीव शिवराज म्हेत्रे हे सलगर गटातून आणि कन्या शीतल म्हेत्रे यांनी तोळणूर गणातून विजय प्राप्त केला आहे. माजी आमदार (कै.) बाबासाहेब तानवडे यांचे पुतणे प्रवीण तानवडे हे वागदरी गटातून विजय झाले. एकंदरीत हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल हा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या कामाला पोचपावती देणारा आणि माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या भावनिक आवाहनाला प्रतिसाद देऊन यश मिळवून देणारा ठरला आहे.

जेऊर गटातील अश्वघोष बनसोडे आणि जेऊर गणातील श्रुती पाटील यांचा अनपेक्षित पराभव झाला आणि जेऊरचे गावकरी आणि मल्लिकार्जुन पाटील यांच्या समर्थकांचा अपेक्षाभंग करणारा ठरला आहे.

Akkalkot Result
Kolhapur ZP : हसन मुश्रीफच ठरले कोल्हापूर जिल्ह्याचे नेते : पालकमंत्री आबिटकरांना होमपीच अन् मतदारसंघात काँग्रेसचा झटका

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजपची मुसंडी

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात एकूण नऊ जिल्हा परिषद गट आणि 18 पंचायत समितीचे गण येतात, त्यातील सात जिल्हा परिषदेचे गट आणि 14 पंचायत समितीच्या गणांत विजय मिळवून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com