

Indapur, 09 February : इंदापूर तालुक्यात पुणे जिल्हा परिषदेच्या आठ आणि पंचायत समितीच्या सर्व १६ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दणदणीत मतांनी विजय मिळविला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांना एकत्र केल्यामुळे इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता मिळविली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादीतून भाजपत आलेले माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आणि झेडपीचे माजी सभापती प्रवीण माने यांनी एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचे प्रयत्न विजयापर्यंत पोचू शकले नाहीत. इंदापूरमध्ये भाजप, शिवसेनेला खातेही उघडता आलेले नाही.
कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा मुलगा श्रीजय भरणे यांनी वालचंदनगर बोरी गटातील बोरी गणातून विजय मिळविला आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील-ठाकरे यांनी बावडा-लुमेवाडी गटातून दुसऱ्यांदा विजय मिळविला आहे. त्या जिल्हा परिषदेत सभापती पदाच्या दावेदार असू शकतात.
माजी मंत्री पाटील यांचे मामा तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचे चिरंजीव यशराज जगदाळे यांनी विजय मिळविला आहे. जगदाळे यांनी वडापुरी-माळवाडी गटात येऊन निवडणूक लढवत विजय मिळविला आहे. जगदाळे यांची प्रथमच जिल्हा परिषदेत एन्ट्री झाली आहे.
इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी सर्व गटनिहाय विजयी उमेदवार
भिगवण शेटफळगढे : मेघना बंडगर राष्ट्रवादी
पळसदेव बिजवडी : हर्षदा जाधव
वडापुरी माळवाडी : यशराज जगदाळे (आप्पासाहेब जगदाळे यांचा मुलगा)
काटी लाखेवाडी : श्रीमंत ढोले
बावडा लुमेवाडी : अंकिता पाटील (हर्षवर्धन पाटील यांची कन्या)
वालचंदनगर बोरी : निर्मला मिसाळ
निमगाव-शेळगाव : सोनाली जाधव
सणसर लासुर्णे : माधुरी भिसे
इंदापूर पंचायत समितीचे राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार
भिगवण : हेमा माडगे
शेटफळगढे : जितेंद्र वणवे
पळसदेव : किर्ती काळे
बिजवडी : दिलीप भिसे
निमगाव : रणजीत भोंग
शेळगाव : जयकुमार कारंडे
बोरी : श्रीराज भरणे
वालचंदनगर : अनिता सोनवणे
काटी : बापू शेंडे
लाखेवाडी : विमल काळे
वडापुरी : अर्चना खबाले
माळवाडी : कल्पना पाटील
लासुर्णे : हर्षवर्धन पाटील
सणसर : जोत्स्ना सुरडकर
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.