Kolhapur ZP Result News : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्याचे नेते म्हणून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावावरच शिक्कामोर्तब झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तब्बल 20 जागांवर विजय मिळवून जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्या पाठोपाठ काँग्रेसने 15 जागा मिळवल्या असून भाजपने 12 जागा मिळवून तिसऱ्या क्रमांक वरचा पक्ष राहिला आहे. शिवसेनेने 9 जागा तर शिवसेनेचा घटक पक्ष असलेल्या राजर्षी शाहू आघाडीने 4 जागा मिळवल्या आहेत. भाजपचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्तीने 6 जागांवर विजय मिळवला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने 2 तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 1 जागा मिळवली.
हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने कागल तालुक्यातील सर्वच जागा जिंकल्या. याशिवाय पन्हाळा, करवीर, चंदगडमध्येही सर्वाधिक जागा घेतल्या आहेत. दुसरीकडे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या राधानगरी-भुदरगड मतदारसंघातच त्यांना धक्का बसला आहे. केवळ हक्काच्या जागा घेण्यात ते यशस्वी ठरले आहेत. आबिटकर राहत असलेल्या गारगोटीमध्ये त्यांना धक्का बसला असून तिथे काँग्रेसच्या उमेदवार विजयी झाले आहेत. ज्या राधानगरी तालुक्यात पालकमंत्री आबिटकर यांनी सर्वाधिक ताकद लावली त्या ठिकाणीही मात्र गड हातातून निसटला आहे. इथे पारंपारिक मतदारांनी काँग्रेसलाच साथ दिली आहे.
काही वर्षांपूर्वी दिवंगत लेमनराव निकम यांनी प्रकाश आबिटकर यांच्यातील नेतृत्व गुण ओळखून अपयशातही पाठ फिरवली नाही, उलट उभारी देणारा भविष्यातील नेता म्हणून आधार दिला. त्या विश्वासातूनच आबिटकरांची आमदारकी, मंत्रिपद व पालकमंत्रिपदाचा प्रवास घडला. आज त्या ऋणाची जाणीव ठेवत दिवंगत निकम यांच्या वारसदारांची जबाबदारी स्वीकारत 'आकुर्डे' गटातून सून अर्चना कल्याणराव निकम यांना शिवसेनेतून उमेदवारी दिली. अखेर अर्चना निकम यांचा विजय झाला. त्यांना निवडून आणून पालकमंत्री आबिटकर यांनी पैरा फेडला आहे.
भाजप - 12
शिवसेना (शिंदे) - 9
राष्ट्रवादी - 20
काँग्रेस - 15
शिवसेना (ठाकरे) - 1
जनसुराज्य - 6
स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1
शाहू आघाडी राजेंद्र पाटील यड्रावकर गट – 4
राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदार संघ
-राशिवडे बुद्रुक - सागर धुंदरे (काँग्रेस)
-कसबा तारळे - अमृता डोंगळे (राष्ट्रवादी काँग्रेस)
-कसबा वाळवे - अरुण जाधव (शिवसेना)
-सरवडे - संयोगिता मोरे (काँग्रेस)
-राधानगरी - अभिजित तायशेटे(काँग्रेस )
- गारगोटी - रेश्मा देसाई (काँग्रेस)
-पिंपळगांव - रोहिणी आबिटकर (शिवसेना)
-आकुर्डे - अर्चना निकम (शिवसेना)
-कडगांव - सारिका नांदेकर (भाजप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.