-हेमंत पवार
Karad Maratha Protest : जालना येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या तरुणांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. या हल्ल्याचा मराठा क्रांती मोर्चाने आज शनिवारी कऱ्हाडच्या दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करुन निषेध नोंदवला. 15 सप्टेंबरपर्यंत संबंधितावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. तसेच गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली.
जालना येथील पोलिस लाठीमाराची संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. जालना येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या तरुणांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. या हल्ल्याचा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज शनिवारी राज्यभर निषेध नोंदवण्यात येत आहे.
कऱ्हाडच्या दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करुन निषेध नोंदवण्यात आला. अमानुषपणे तरुणांना मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्यात करावे, अशी मागणी करण्यात आली. 15 सप्टेंबरपर्यंत संबंधितावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली.
Edited By Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.