BMC निवडणुकीपूर्वीच भाजप-शिंदेंच्या शिवसेनेत 50 जागांवरून आरपारची लढाई; सत्तेसाठी रस्सीखेच सुरू!

BMC elections 2025 News : मुंबईतील जागावाटपावरून सध्या भाजप व शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच दिसत आहे. मुंबईतील 50 जागांवरून भाजप आणि शिवसेनेत चुरस दिसून येते.
Devendra fadnavis, eknath shinde, uddhav thakcray
Devendra fadnavis, eknath shinde, uddhav thakcray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आतापासूनच अंग झटकून कामाला लागले आहेत. त्यामुळे सध्या महायुती व महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. मुंबई महापालिका निवडणूक महायुती एकत्रित लढण्याही शक्यता आहे. त्याचमुळे सध्या जोरदार तयारी सुरु आहे. विशेषतः भाजप व एकनाथ शिंदेंची शिवसेना गेल्या काही दिवसापासून प्रयत्न सुरु आहेत. मुंबईतील जागावाटपावरून सध्या भाजप व शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच दिसत आहे. मुंबईतील 50 जागांवरून भाजप आणि शिवसेनेत चुरस दिसून येते.

मुंबई महापलिका निवडणुकीपूर्वी मोठी रस्सीखेच पहावयास मिळत आहे. विशेषतः गेल्या तीन वर्षाच्या काळात निवडणुका झाल्या नसल्याने याठिकाणी प्रशासक आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनकडे असलेल्या 84 पैकी 44 माजी नगरसेवक फोडले आहेत. त्यामुळे सध्या शिंदे यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणात माजी नगरसेवक दिसत असल्याने त्यांचे बळ मुंबईत वाढले आहे. विशेषतः 2017 च्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून शिंदे गटात गेलेल्या 44 नगरसेवकांनी भाजपच्या उमेदवारांचा पराभव करून विजय मिळवला होता. त्यामुळे आता शिंदे गट या जागांवर आपला हक्क सांगत आहे, तर भाजपलाही आपला प्रभाव कायम ठेवायचा आहे. त्यामुळे या 50 जागांवर दोन्ही पक्षात मोठी रस्सीखेच आहे.

Devendra fadnavis, eknath shinde, uddhav thakcray
Bacchu Kadu protest : बच्चू कडू आक्रमक, सरकारी यंत्रणा लागली कामाला; ‘रामगिरी’वर सुरक्षा वाढविली...  

मुंबईतील दहिसर, अंधेरी, जोगेश्वरी, विक्रोळी, घाटकोपर, गोरेगाव यांसारख्या मुंबईतील काही वॉर्डांत गेल्या निवडणुकीत कडवी लढत झाली होती. त्यामुळे हाच भाग आता महायुतीमधील भाजप (BJP) व शिंदे शिवसेनेच्या जागावाटपाच्या वाद उफाळून आला आहे. पश्चिम उपनगरात वॉर्डांची संख्या जास्त असून, त्या भागातून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी सर्व पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. शिंदे गटातील नेत्यांना या भागांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे, तर भाजपलाही आपल्या पारंपरिक मतांवर दावा करायचा आहे. त्यामुळे या 50 जागांवर दोन्ही पक्षाचा डोळा आहे.

Devendra fadnavis, eknath shinde, uddhav thakcray
Local Body Elections : ‘स्थानिक’चं मैदान मारण्यासाठी भाजपचा अजितदादांसह शिंदेंनाही ‘दे धक्का’; वाचा ‘मेगाप्रवेशा’ची संपूर्ण यादी...

विभागवार बैठकांपाठोपाठ आता शिंदेंच्या शिवसेनेकडून बुथ लेव्हलवर मोर्चेबांधणी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे भाजप आणि शिंदे गटातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. महायुती एकत्र लढणार असली, तरी या 50 जागांवरून सुरू असलेला संघर्ष निवडणुकीच्या रणधुमाळीत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांना हे वाद मिटवून एकजुटीने निवडणूक लढवणे हे एक मोठे आव्हान असणार आहे.

Devendra fadnavis, eknath shinde, uddhav thakcray
Local Body Election : मोठी बातमी! महाविकास आघाडीला मिळाली 'बहुजन'ची ताकद; राजकीय समीकरण बदलणार!

आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीसाठी या ठिकाणी ठाकरे बंधूचे आव्हान असणार आहे. हिंदी सक्तीच्या मुद्द्यांवरून एकत्र आलेल्या राज-उद्धव ठाकरे या दोन भावाची महापालिका निवडणुकीपूर्वी युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या युतीचे मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे भाजप व शिंदे यांच्या शिवसेनेला ही निवडणूक जिंकण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे आधीपासूनच महायुतीमध्ये धाकधूक आहे.

Devendra fadnavis, eknath shinde, uddhav thakcray
BJP office land transfer dispute : भाजप प्रदेश कार्यालयाच्या जागेचा वाद, हस्तांतरणात नियम अन् अटीचा भंग; रोहित पवारांची चौकशी मागणी

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी येत्या देण्याचे काळात होत असलेल्या महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याचे आश्वासन देऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील अर्धे नगरसेवक गळाला लावले आहेत. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत उमेदवारी द्यावी लागणार आहे. शिंदे यांनी त्यांना उमेदवारी दिली नाही तर त्या वार्डात बंडखोरी होऊन त्याचा फायदा ठाकरे बंधूंना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात या जागेवरून भाजप व शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे.

Devendra fadnavis, eknath shinde, uddhav thakcray
Shivsena News : निवडणुकीपूर्वीच संजय शिरसाट यांच्या लेकाला 'महापौरपदासाठी' शुभेच्छा : छत्रपती संभाजीनगरात इच्छुकांमध्ये अस्वस्थता

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला येत्या काळात राज ठाकरे यांची साथ लाभणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत विजय मिळवणे कोणालाच सोपे राहिले नाही. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मायक्रो प्लॅनिंग केले जात आहे. शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी बैठकीचा सपाटा लावला आहे. त्यासोबतच बूथनिहाय नियोजन केले जात आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे.

Devendra fadnavis, eknath shinde, uddhav thakcray
NCP News : अजित पवार काँग्रेसचा अख्खा मतदारसंघच रिकामा करणार : एकाच वेळी दोन दिग्गज माजी मंत्र्यांना धक्का

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com