Jayant Patil : वाद मिटताच जयंत पाटलांनी विशाल पाटलांना दिलं DNA प्रमाणपत्र, पण जेव्हा जयंत पाटील गोड बोलतात....

Jayant Patil On Vishal Patil : लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आमदार जयंत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांच्या सुरू झालेला वाद महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर थांबण्याची शक्यता आहे.
jayant Patil Vishal Patil
jayant Patil & Vishal Patilsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेसाठी जयंत पाटील, विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  2. विशाल पाटील अपक्ष असले तरी त्यांचा राजकीय ‘डीएनए’ काँग्रेसचा असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

  3. या विधानामुळे जयंत–विशाल वादावर पडदा पडत महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय स्पष्टता आली आहे.

Sangli News : लोकसभा पाटोपाठ विधानसभा निवडणूक झाली. मात्र या निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील आमदार जयंत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांच्यातील वाद मिटेल याची शक्यता धूसर होत चालली होती. अशातच नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये जयंत पाटल यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महानगरपालिकेच्या आघाडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. मात्र काळाची आणि धोक्याची पावले ओळखून आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत आघाडी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर ही जयंत पाटील हे विशाल पाटलांना काँग्रेसचे म्हणून स्वीकारतील का? असा सवाल विचारला जात होता. अखेर त्याबाबतची संभ्रमता आमदार जयंत पाटील यांनीच संपवली आहे.

आमदार जयंत पाटील हे विशाल पाटील यांच्याकडे नेहमीच अपक्ष म्हणून पाहत आले होते. महाविकास आघाडी आणि त्यापूर्वी झालेल्या कार्यक्रमात आमदार पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांचा उल्लेख स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते असा उल्लेख करायचे. लोकसभेच्या निकालानंतर ते महाआघाडीच्या व्यासपीठावरही त्यांचा उल्लेख ‘अपक्ष खासदार’ असा करायचे. थोडक्यात ‘त्यांचा आणि काँग्रेसचा संबंध काय?’ असं त्यांना सुचवयाचे असावे.

त्यावर विशालदादांनी समोरासमोर नाराजी व्यक्त केली होती. या दोघांमधील संघर्ष इतका टोकाचा बनला होता की लोकसभा निवडणुकीनंतर खासदार विशाल पाटील यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात अनेक सत्कारचे कार्यक्रम आयोजित करत असताना अप्रत्यक्षपणे थेट जयंत पाटील यांना आव्हान दिले होते. इस्लामपूर-वाळवा हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मतदार संघ आहे. या मतदारसंघावर या पुढच्या काळात आपलं विशेष लक्ष राहील. शिवाय आता नवीन निर्णय घ्यावे लागतील, अशा शब्दात त्यांनी इशारा दिला होता.

jayant Patil Vishal Patil
Jayant Patil-Vishal Patil Alliance : धोका ओळखला! कट्टर विरोधक एकत्र; जयंत पाटील-विशाल पाटलांकडून युतीची घोषणा, विश्वजित कदमही उपस्थित

दरम्यानच्या काळात खासदार विशाल पाटील यांनी वाळव्यात काँग्रेसचा मेळावा आयोजित केला होता. 1999 नंतर वाळव्यामध्ये काँग्रेसचे अस्तित्व क्षीण झाले असे म्हणत विशाल पाटील यांनी अप्रत्यक्ष जयंत पाटील यांना डिवचलं होते. वाळवा तालुक्यात काँग्रेसचा विचार जपणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बापूंच्या काळातही नगरपालिका आणि पंचायत समितीवर काँग्रेसची सत्ता होती. वसंतदादांनी मोठपणा दाखवत बापूंच्या मुलांना बरोबर घेतले. मात्र, त्यांनी शांतपणे काँग्रेस संपवली अशी टीका विशाल पाटील यांनी केली होती. या मेळाव्यानंतर मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची चांगलीच जुंपली होती. खासदार विशाल पाटील आणि आमदार जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आरोप प्रत्यारोपाने टीका करत व्यक्तिगत पातळी गाठली होतो.

या संपूर्ण प्रकारानंतर शांत बसतील ते जयंत पाटील कसले. सांगलीमध्ये पार पडलेल्या एका होड्या स्पर्धेच्या कार्यक्रमात अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी नदीत जास्त होड्या झाल्या की शहाण्याने काठ कधी सोडू नये, आमच्यातील अनेकजण तिकडे गेले आहेत. त्यांना खासदार विशालनेच सांगितले असेल, तिकडे जावा म्हणून. विशाल पाटील कधी काय करतील याचा नेम नाही, असा टोला जयंत पाटलांनी लगावला होता.

पडळकरांच्या वक्तव्याने चित्र पालटले

दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यानंतर खासदार विशाल पाटील यांनी आमदार जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. त्यांनी "जयंत पाटील आणि आपल्यात राजकीय शत्रूत्व असल्याचे मान्य केले. वसंतदादा व राजारामबापू यांचात राजकीय वाद होता, तो वैचारिक वाद होता. आज आमच्यातही वाद असून तो तिसऱ्या पिढीपर्यंत आला आहे. पण अशा पध्दतीने टीका होत असेल त्यावेळी आम्ही गप्प बसू असे आमच्यावर संस्कार नाहीत. आम्ही एकमेकांवर वाटेल ते बोलू, ते चालतं. मात्र दादा बापू यांनी या जिल्ह्यासाठी काय केले असा प्रश्न कोण करत असेल तर? आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. कौरव पांडव यांच्यात युद्ध होते, पण चित्रसेनाच्या विरोधात ते एकत्र लढले. आमचंही महाभारता सारखंच आहे. जयंत पाटील आमचा करेक्ट कार्यक्रम करणार हे देखील मला माहीत आहे, अशा शब्दात भूमिका व्यक्त केली होती.

jayant Patil Vishal Patil
Jayant Patil Video: हजामती करत होते का? मंत्री झाला म्हणून लय कळत नाही..., जयंत पाटील प्रचंड आक्रमक; मंत्री सावकारेही भिडले

संपूर्ण घडामोडीनंतर देखील नगरपालिका नगरपंचायत मध्ये आमदार जयंत पाटील यांची भूमिका आणि शिराळा नगरपंचायतीमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या भविष्यातील आघाडी बाबत अनेक शंका उपस्थित केल्या होत्या. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात सांगली महानगरपालिका निवडणुकीत स्वतंत्र लढण्यासाठी चाचपणी झाली. तर जयंत पाटील यांनी व्यक्तिगत जोडण्या सुरू केल्या होत्या. मात्र भाजपने सांगली महानगरपालिकेवर मिळवलेली कमांड आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांना घातलेला गळ यावरूनच दोघांच्याही मनात शंकेची पाल चुकचुकली असावी. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत आघाडी करण्याचा निर्णय जयंत पाटील यांच्यासह विश्वजीत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांनी घेतला.

आता मात्र जयंत पाटील अन् खासदार विशाल पाटील यांचे सूत जुळताना दिसतेय. सोमवारी महाआघाडीच्या घोषणेसाठी विश्‍वजित यांच्यासोबत ते तिघे एकत्र आले. महाविकाआघाडीत अपक्ष खासदार विशाल पाटील असणार अशी गुगली टाकली. यावेळी मात्र जयंत पाटील यांनी खासदार विशाल पाटलांचे कौतुक केले. त्यात कोणतेही कसूर ठेवली नाही. विशाल अपक्ष असले तरी त्यांचा ‘डीएनए’ काँग्रेसचा आहे. त्यांच्या विजयासाठी समस्त काँग्रेसवाल्यांनी प्रयत्न केल्याचे सांगितले.

पण यापूर्वीच खासदार विशाल पाटील यांना उपदेशून जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी जेंव्हा गोड बोलतात तेंव्हा काय करतात याचा दाखला दिला होता. त्यामुळे जयंत पाटलांचे हे गोड शब्द खासदार विशाल पाटील यांच्या राजकीय भवितव्याचे यश ठरणार की अपयश ठरणार हा आगामी काळाच ठरवणार आहे.

jayant Patil Vishal Patil
Jayant Patil Politics : जयंत पाटील 'अ‍ॅक्शन मोड'वर, मिशन सांगली महापालिका; गाठीभेटी सुरू, काँग्रेसवर 'भरसो नाय'?

FAQs :

1. सांगली महापालिकेसाठी कोणाची आघाडी झाली आहे?
➡️ काँग्रेससह जयंत पाटील, विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांची आघाडी झाली आहे.

2. जयंत पाटील आणि विशाल पाटील यांच्यात वाद होता का?
➡️ होय, लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर वादाची चर्चा होती.

3. विशाल पाटील कोणत्या पक्षाचे आहेत?
➡️ ते अपक्ष खासदार आहेत.

4. जयंत पाटील यांनी विशाल पाटीलांबाबत काय विधान केले?
➡️ विशाल अपक्ष असले तरी त्यांचा ‘डीएनए’ काँग्रेसचा असल्याचे त्यांनी सांगितले.

5. या आघाडीचा उद्देश काय आहे?
➡️ सांगली मिरज कुपवाड महापालिकेत मजबूत राजकीय आघाडी करून निवडणूक लढवणे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com