Jayant Patil News : राष्ट्रवादीने हसन मुश्रीफांना पाठवले की गेले? जयंत पाटलांनी केलं उघड!

Jayant Patil On Hasan Mushrif : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी हसन मुश्रीफांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
jayant patil, hasan mushrif
jayant patil, hasan mushrif Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur Political News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विधानावरून नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. जयंत पाटील यांनी महागाईवरून बोलताना भाजपला रावणाची उपमा देत सडकून टीका केली आहे. इचलकरंजी येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर ही टीका केली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही पाटील यांनी निशाणा साधला.

jayant patil, hasan mushrif
Sangli NCP News : जयंत पाटलांच्या सांगली राष्ट्रवादीतही लवकरच फेरबदल

गॅस, पेट्रोल व वीजदरात वाढ झाल्यामुळे महागाईने मागील वर्षभरात सर्वोच्च टोक गाठले आहे. महागाईमुळे जनता हैराण झाली आहे. महागाईचा भाजपरूपी रावण दहन करायला हवा, असं जयंत पाटील म्हणाले. येथील श्रीराम सेवाभावी ट्रस्टच्या वतीने जवाहरनगर येथे आयोजित दसरा महोत्सवाच्या रावण दहन कार्यक्रमात ते बोलत होते.

गेल्या वर्षी रावणाचे दहन करण्यासाठी इचलकरंजीत आलेल्या हसन मुश्रीफ यांना भाजपरूपी रावणाचे दहन करण्यासाठी मुद्दाम रावणाजवळ पाठविले आहे. आता सर्वांनी मिळून भाजपरूपी रावणाचे दहन करूया, असे आवाहन पाटील यांनी केले.

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात श्रीराम सेवाभावी ट्रस्ट यांच्या वतीने विजयादशमी दसऱ्याच्या निमित्ताने आयोजित रावण दहन सोहळा आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झाला. हजारो इचलकरंजीवासीयांच्या साक्षीने परंपरेनुसार सोने लुटले व रावण दहन पार पडले. या वेळी माजी आमदार राजीव आवळे, प्रदेश सदस्य मदन कारंडे, माजी सभापती नितीन जांभळे, संदीप मुळीक आदी उपस्थित होते.

jayant patil, hasan mushrif
Satara NCP News : अजित पवारांचे निष्ठावंत अमित कदमांवर दिली महत्त्वपूर्ण जबाबदारी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.