Sanjay Dina Patil : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं संजय दिना पाटलांबाबत भाष्य : ‘ही वाक्ये आपलं राजकारण संपवून टाकतील, एवढचं लक्षात ठेवं, संजय’

Jitendra Awhad Statement : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर संजय दिना पाटील पुन्हा चर्चेत आले आहेत. पत्रकारांना दिलेल्या धमक्यांमुळे त्यांच्यावर टीका होत असून राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटत आहेत.
Sanjay Dina Patil
Sanjay Dina PatilSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 25 June : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणारे संजय दिना पाटील पक्षांतरामुळे अगोदर चर्चेत आले होते. त्यात आता त्यांनी पत्रकारांना दिलेल्या धमक्यांची भर पडली आहे. त्यामुळे त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्याने संजय दिना पाटलांचं राजकारण ‘त्या’ वाक्यामुळे संपण्याची शक्यता बोलून दाखवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, हे उघडपणे बोलायचं नसतं. पण मी बोलतो. संजय हे चांगलं नाही. जरा शांत राहा. तो जरा गरम डोक्याचा आहे आणि तो कोणाच्या ऐकणाऱ्यातील नाही.

आता आम्हाला एक भीती आहे की, पवारसाहेब आपल्याला ओरडतील. ही भीती आमच्या मनात कायम असते. आपण काही चुकीचं बोललं आणि टिव्हीवर दिसलं की आम्हाला खात्री आहे की, तिसऱ्या-चौथ्या मिनिटाला पवारसाहेबांचा फोन येणार, काय रे जितेंद्र? असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, ती भीती आमच्या मनात आई बापाच्या भीतीसारखी कायम असते, त्यामुळे आमच्या वर्तनात, बोलण्यात मर्यादा पाळतो. प्रत्येकाला एक भीती असावी लागते. मला वाटतं संजय दिना पाटील हे कोणालाच घाबरत नाही. त्याला भीतीच नाही. कधी त्यांनी त्रासही भोगलेला नाही. कारण त्याचे आई-वडील मोठे होते. लाडात वाढलेला आहे.

Sanjay Dina Patil
Shivsena Corporator : 8 लाख दिल्याशिवाय बुलेट, मारुती गाडी देणार नाही; शिवसेना नगरसेवकाची अवैध सावकारी, गुन्हा दाखल

मित्रत्वाचा सल्ला म्हणून माझं संजय दिना पाटील यांना सांगणं आहे की, बॉम्ब टाकेन, मारून टाकीन, ओ जमाना अभी नही राहा भाई...ती वाक्य आपलं राजकारण संपवून टाकतील, एवढंच फक्त लक्षात ठेव, संजय, असा सल्लाही जितेंद्र आव्हाड यांनी खासदार पाटील यांना दिला.

आमदार आव्हाड म्हणाले, राजकारणाचा स्तर घसरत चाललाय, हे भाजपवाल्यांनी सांगू नये. हा स्तर घसरवला कोणी? वैयक्तिक द्वेषाचे राजकारण या देशात कोणी केलं? आईसचा वापर कोणी केला? इनकम टॅक्स, सीबीआय आणि ईडीचा वापर कोणी केला? या देशाला २०१४ च्या अगोदर ईडी, सीबीआय माहीत तर होतं का? त्यामुळे भापवाल्यानी सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये.

संजय दिना पाटील हा माझा मित्र आहे म्हणून बोललो. नाही तर आयुष्यात कधी बोललो नसतो. पण ज्याच्याबरोबर आपण लहानपासून दिवस काढलेत. म्हणून मी इतका उघडपणाने बोलतो. नाही तर मी कोणाबद्दल कधीच बोलत नाही. मित्र नसता तर मी त्याला म्हटलं असतं तुझ्याकडं बॉम्ब आहे तर टाक, असेही आव्हाड यांनी नमूद केले.

Sanjay Dina Patil
Kolhapur politics : 'गोकुळ'वरून कोल्हापुरात ठिणगी! मुश्रीफांच्या मेळाव्याच्या प्रवेशद्वारावरच सतेज पाटलांची बॅनरबाजी

आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, संजय पाटील माझा मित्र आहे. मित्र म्हणून मी त्याला नाकारत नाही. त्याने जे केलं, ते चुकीचं केलं, असंही मी म्हणेन. कारण त्याला तिकिट देण्यात, मिळविण्यात, बाकीच्या प्रवासात मी त्याला साथ दिली आहे. त्याच्या पहिल्या तिकिटापासून मी त्याला साथ दिली आहे. मी विसरला असेल, त्याच्या लक्षात आहे, हे मला माहिती नाही. पण तो काही गुंड प्रवृत्तीचा नाही. पाच मर्डर केले, असं तो कसा काय बोलला माहिती नाही. भावनेच्या भरात बोलायचं नसतं. पण ऑन रेकॉर्ड आलं आहे, इथं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com