Karad Politics : कराडमध्ये राष्ट्रवादीचे ढासळलेले बुरूज सावरण्याचे आव्हान : ग्रामपंचायत निवडणुकीत उत्तर-दक्षिणेतील झुंज ठरणार निर्णायक

NCP Karad : कराड ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे वर्चस्व कायम ठेवण्याचे प्रयत्न सुरू असून राष्ट्रवादीला उत्तर-दक्षिणेत ढासळलेले बुरूज सावरण्याचे मोठे आव्हान आहे. काँग्रेसही गावपातळीवर रणनीती आखत आहे.
Political leaders and party workers strategizing during Karad Gram Panchayat election campaign amid BJP dominance and NCP rebuilding efforts in North and South Karad.
Political leaders and party workers strategizing during Karad Gram Panchayat election campaign amid BJP dominance and NCP rebuilding efforts in North and South Karad.Sarkarnama
Published on
Updated on

Karad Taluka Gram-Panchayat Elections News : कराड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यात भाजपने बाजी मारली. मात्र, दोन्ही राष्ट्रवादीला सत्तेसाठीच्या संख्याबळासाठी मतदारांचा कौल मिळाला नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दोन गट आणि चार गणांत, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला कराड उत्तरेत केवळ तीन पंचायत समिती सदस्य निवडून आले. एकाही गटात विजय मिळवता आला नाही.

त्यातच सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत आहे. त्यामुळे यावेळी कराड उत्तरेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत ढासळलेले बुरूज सावरण्यासाठी पुन्हा गावोगावी गट बांधणीसाठी फील्डिंग लावावी लागणार आहे. दक्षिणेतही राष्ट्रवादीला उभारी घेण्याची संधी मिळणार आहे. मात्र, त्या संधीचं किती सोनं होणार? हे येणारा काळच ठरवेल.

कराड तालुक्यातील 132 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यापैकी 28 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना यापूर्वीच अंतिम झाली आहे. तर 104 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना नव्याने करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 4 मे रोजी प्रभाग रचना अंतिम होणार आहे. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल.

जिल्हा परिषद व कराड पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निकालातून तालुक्यातील मतदारांनी भाजपला स्वीकारल्याचे स्पष्ट दिसून आले. तालुक्यात पहिल्यांदाच भाजपने कराड दक्षिणेत आमदार डॉ. अतुल भोसले व उत्तरेत आमदार मनोज घोरपडे यांनी 12 पैकी 8 गटांत, तर पंचायत समितीच्या 24 पैकी 13 गणांत स्पष्ट बहुमत मिळवले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 1 गट आणि 2 गणात विजयी मिळवला. पाटण मतदारसंघात असलेल्या तांबवे गटात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या शिवसेनेला यश आले नाही. मात्र, पंचायत समितीच्या दोन्ही जागा त्यांच्या निवडून आल्या. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला उत्तरेत पंचायत समितीत तीनच जागा मिळाल्या.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना जिल्हा परिषदेच्या 2 गट व पंचायत समितीच्या 4 जागांवर विजय मिळाला. त्यातून दोन्ही राष्ट्रवादीला पुन्हा गट बांधणीची आवश्यकता असल्याचे समोर आले. त्यातच पुढील टप्प्यात तालुक्यात 132 ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहेत. त्यासाठी गावोगावी मोर्चेबांधणी सुरू आहे. स्थानिक नेत्यांकडून रणनीती आखली जात आहे.

भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी

विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समितीत भाजपला कराड तालुक्यात चांगले यश मिळाले. कराड दक्षिण व उत्तरचे दोन्ही आमदार भाजपचे आहे. जिल्हा परिषद निवडणुकीतही 12 पैकी 8 जागा भाजपला मिळाल्या. पंचायत समितीवरही भाजपचीच एकहाती सत्ता आली आहे. त्यामुळे गावोगावी भाजप समर्थकांची संख्या वाढली आहे.

Political leaders and party workers strategizing during Karad Gram Panchayat election campaign amid BJP dominance and NCP rebuilding efforts in North and South Karad.
Karad BJP : ऐतिहासिक सत्तांतर! कराड पंचायत समितीवर भाजपचा झेंडा : दोन्ही राष्ट्रवादीवर आत्मचिंतनाची वेळ, काँग्रेसचा दिवा विझण्याच्या मार्गावर

आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठीही भाजपने फील्डिंग लावण्यास प्रारंभ केला आहे. मोठ्या गावांवर भाजपच्या नेत्यांनी लक्ष केंद्रित केले असून, आपल्याच विचाराची ग्रामपंचायत व्हावी, यासाठीही आत्तापासून वातावरण निर्मिती सुरू केली आहे. त्यामुळे भाजपकडे इच्छुकांचीही गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे.

Political leaders and party workers strategizing during Karad Gram Panchayat election campaign amid BJP dominance and NCP rebuilding efforts in North and South Karad.
Karad Politic's : यशवंतराव चव्हाण, उंडाळकर, पृथ्वीराजबाबांच्या कर्मभूमीतून काँग्रेसचा हात गायब

काँग्रेसकडूनही मोर्चेबांधणी

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मोजक्याच जागांवर उमेदवार उभे करून काँग्रेसने लिटमस टेस्ट घेतली. त्यात काँग्रेसला एक जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समितीच्या जागांवर विजय मिळवता आला. त्यानंतर आता प्रभाव असणाऱ्या क्षेत्रातील गावात काँग्रेसनेही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पारंपरिक गटाच्या साहाय्याने त्यांनी गट बांधणीसाठी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. मात्र, काँग्रेसचा कमी झालेला प्रभाव पाहता गावची सत्ता मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतील, अशी स्थिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com