Karad BJP : यशवंतराव चव्हाणांच्या कराड तालुक्यावर भाजपचा झेंडा : पहिल्यांदाच जिंकली पंचायत समिती; 2 आमदारांमध्ये लगेचच सत्तेची वाटणीही ठरली?

Karad Political News : यशवंतराव चव्हाणांच्या कराड तालुक्यात भाजपने पहिल्यांदाच पंचायत समितीवर एकहाती सत्ता मिळवली. 13 सदस्य निवडून येत ऐतिहासिक विजय मिळवला असून सभापती-उपसभापती पदाच्या वाटपाची जोरदार चर्चा सुरू आहे.
Newly elected BJP members celebrate historic majority in Karad Panchayat Samiti, marking first-ever victory in Yashwantrao Chavan’s political stronghold.
Newly elected BJP members celebrate historic majority in Karad Panchayat Samiti, marking first-ever victory in Yashwantrao Chavan’s political stronghold.Sarkarnama
Published on
Updated on

Karad Panchayat Samiti : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कराड तालुक्यातील पंचायत समितीवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकला आहे. भाजपने ऐतिहासिक सत्तांतर घडवत 13 सदस्य निवडून आणून एकहाती सत्ता काबीज केली आहे. या निकालानंतर आता इच्छुकांनी नेत्यांकडे सभापतीपदासाठी लॉबींग सुरु केले आहे.

कराडमध्ये भाजपचे दोन आमदार आहेत. यात दक्षिणचे आमदार अतुल भोसले यांचे 8 तर, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांचे 5 सदस्य आहेत. पंचायत समितीचे सभापतीपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. आमदार भोसले यांचे ज्यादा सदस्य असल्याने त्यांच्याकडेच सभापतीपद तर घोडपडे यांच्या गटाला उपसभापतीपद राहील, अशी चर्चा आहे.

कऱ्हाड तालुक्यातील जिल्हा परिषदेचे 12 गट व पंचायत समितीच्या 24 गणांसाठी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी भाजपला स्वीकारल्याचे निकालातून दिसून आले. तालुक्यात पहिल्यांदाच भाजपला 12 पैकी आठ गटात, 24 पैकी 13 गणात स्पष्ट बहुमत मिळाले. त्यामुळे पंचायत समितीवर भाजपने पहिल्यांदाच ऐतिहासिक सत्तांतर घडवत एकहाती सत्ता काबीज केली.

भाजपच्या धैर्यजा माने (चरेगाव), कोमल यादव (वडोली भिकेश्वर), डॉ. संतोष पाटील (मसुर), अनिता वेताळ (वाघेरी), प्रियांका पळसे (हजारमाची), माधवी पाटसुपे (सैदापुर), नरेंद्र नांगरे-पाटील (कोयना वसाहत), अर्जुन कराळे (कोळे), नंदाताई यादव (विंग), दादासो मरगळे (गोळेश्वर), वर्षा निकम (शेरे), धनंजय पाटील (रेठरे बुद्रुक), गोविंद गावडे (काले) हे सदस्य निवडून आले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रताप चव्हाण (पाल), संगीता चव्हाण (उंब्रज), सिध्दार्थ चव्हाण (कोपर्डे हवेली) हे तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पुजा काटवटे (कार्वे), स्वाती थोरात (कालवडे), नितीन थोरात (सवादे), वृषाली पाटील (येळगाव) हे तर, शिवसेनेचे जयश्री पाटील (सुपने) व दिनेश कुंभार (तांबवे) हे दोन आणि काँग्रेसचे संग्राम पवार (तळबीड) व रविंद्र बडेकर (वारुंजी) हे सदस्य निवडून आले.

सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने या गटातून कऱ्हाड दक्षिणेतील विंग गणातून नंदाताई यादव, शेरे गणातून वर्षा निकम तर, कऱ्हाड उत्तरेतून वडोली भिकेश्वर गणातून कोमल यादव, वाघेरी गणातून अनिता वेताळ या सभापतीपदाच्या दावेदार आहेत.

Newly elected BJP members celebrate historic majority in Karad Panchayat Samiti, marking first-ever victory in Yashwantrao Chavan’s political stronghold.
Satara ZP : सातारा झेडपीत मोठा ट्विस्ट, भाजपच्या हातातोंडाशी आलेली सत्ता जाणार: राष्ट्रवादीने गेम फिरवला!

भाजपच्या सदस्यात आमदार डॉ. भोसले यांचे 8 सदस्य असल्याने सभापतीपद हे कऱ्हाड दक्षिणला आणि उपसभापतीपद हे कऱ्हाड उत्तरला मिळेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, आमदार डॉ. अतुल भोसले आणि आमदार मनोज घोरपडे हे कोणाला संधी देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Newly elected BJP members celebrate historic majority in Karad Panchayat Samiti, marking first-ever victory in Yashwantrao Chavan’s political stronghold.
Karad Politic's : यशवंतराव चव्हाण, उंडाळकर, पृथ्वीराजबाबांच्या कर्मभूमीतून काँग्रेसचा हात गायब

दक्षिण उत्तरचा समतोल साधावा लागणार

कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघातुन आमदार डॉ. अतुल भोसले यांचे आठ तर कऱ्हाड उत्तरमधुन आमदार घोरपडे यांचा पाच सदस्य निवडुन आले आहेत. त्यामुळे सभापतीपदासाठी दक्षिणमधुन दावा होणार आहे. त्यामुळे दक्षिण व उत्तरचा समतोल साधण्यासाठी उत्तरमध्ये उपसभापतीपद द्यावे लागणार आहे. त्यामुळे उपसभापतीपदाची लॉटरी कोणाला लागणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे त्यासाठीही इच्छुकांनी नेत्यांकडे फिल्डींग लावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com