Ajit Pawar Memorial : कोल्हापुरात होणार अजितदादांचं स्मारक; महापालिकेच्या पहिल्याच सभेत ठरावं मंजूर

Kolhapur Municipal Corporation meeting : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्मारक करण्याबाबतचा ठराव कोल्हापूर महापालिकेच्या पहिल्याच सभेपुढे ठेवण्यात आला होता. तो ठराव मंजूर झाल्यामुळे आता कोल्हापुरात अजित पवारांचं स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
The proposed site at Shiroli Jakath Naka in Kolhapur, where the Ajit Pawar memorial is expected to be constructed following the KMC resolution
The proposed site at Shiroli Jakath Naka in Kolhapur, where the Ajit Pawar memorial is expected to be constructed following the KMC resolutionSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 20 Feb : कोल्हापूर महानगरपालिकेच्या पहिल्याच जनरल सभेमध्ये आठ स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली. तसेच कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारावर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्मारक होण्याचा ठराव आणि कोल्हापूर शहरामध्ये स्वर्गीय अजित पवार यांचे स्मारक शिरोली जकात नाका परिसरात उभा करण्यात यावे असे ठराव या सभेपुढे ठेवण्यात आला.

तसेच दुसरा ठराव शहराच्या प्रवेशद्वारा जवळ किंवा प्रमुख दर्शनी चौकात एक वर्षाच्या आत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्मारक उभा करण्याचा ठराव करण्यात आला. येत्या पंधरा दिवसात महापालिका प्रशासनाने जागा शोधावी ती मंजूर करावी. सर्व अधिकारी, नगरसेवक यात कुठेही कमी पडणार नाहीत. त्यांच्या पहिल्याच पुण्यतिथीला हे स्मारक पूर्ण करावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते राजेश लाटकर यांनी केली.

स्थायी समितीसाठी आज 6 सदस्यांची निवड करण्यात आली. काँग्रेसकडून इंद्रजित बोन्द्रे, प्रतापसिंह जाधव, प्रवीण केसरकर, सुभाष बुचडे, प्रतिज्ञा उत्तूरे, अमर समर्थ, प्रवीण सोनवणे, तर भाजपकडून विशाल शिराळे, राजनंदा महाडिक, नेहा तेंडुलकर, बबन मोकाशी, पूर्वा राणे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.

The proposed site at Shiroli Jakath Naka in Kolhapur, where the Ajit Pawar memorial is expected to be constructed following the KMC resolution
Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर महापालिकेत ऑडियो बॉम्ब फुटला; भ्रष्टाचाराचा आरोप करत दोघांना स्वीकृतसाठी विरोध

शिवसेनेकडून अर्चना पागर, शिला सोनवणे आणि अनुराधा खेडकर तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिल फरास यांची नियुक्ती झाली. दरम्यान, स्थायी समिती सदस्यावर निवड करत असताना काँग्रेसने विशेष खबरदारी घेतलेली दिसते. कारण सभागृहातील अनुभवी आणि अभ्यास असणाऱ्या सर्वच 7 चेहऱ्यांना संधी देण्यात आली. तर उलट भाजपकडून नव्या चार चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे भाजपचा सभापती असला तरी या अनुभवी सदस्यचा वचक सभापतीवर असेल.

परिवहनसाठी 12 सदस्याची निवड करण्यात आली. यामध्ये काँग्रेसकडून दुर्वास कदम, उमेश पोवार, अक्षय शेतके, महेंद्र कोरडे, श्रीधर गाडगीळ यांना संधी देण्यात आली. त्यामध्ये शेटके, कोरडे आणि गाडगीळ या 3 कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली. भाजपकडून प्रसाद जाधव, हेमंत आराध्ये, संतोष लाड, प्रश्नांत मोरे या ठिकाणी सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली. शिवसेनेकडून नगरसेवक सत्यजित जाधव, व रोहन अतिगरे या कार्यकर्ताला संधी देण्यात आली. तर राष्ट्रवादी काँग्रेस मानसी लोळगे यांची नियुक्ती झाली.

The proposed site at Shiroli Jakath Naka in Kolhapur, where the Ajit Pawar memorial is expected to be constructed following the KMC resolution
Raigad Zilla Parishad : भाजपचा सुनील तटकरेंना सबुरीचा सल्ला : शिवसेनेला लांब ठेवायच्या विचाराला ब्रेक मारा; सातारा, सांगलीचे गणित लक्षात असू द्या!

महिला व बालकल्याण समितीवर काँग्रेसकडून अरुणा गवळी, धनश्री कोरवी, अनुराधा मुळीक, जयश्री कांबळे तर भाजपकडून वंदना मोहिते , नीलिमा पाटील, मानसी लोळगे, शिवसेनाकडून प्राजक्ता जाधव, कौसर बागवान यांची निवड केली आहे. स्वीकृत सदस्यसाठी काँग्रेस सुनील मोदी, मुस्ताक मलबारी, राहुल माने यांची निवड झाली.

भाजपकडून विजय जाधव, जयंत पाटील, सुनील वाडकर तर शिवसेनेकडून रत्नेश शिरोळकर, प्रसाद चव्हाण यांचे निवड करण्यात आल्यानंतर त्याला महापौर रूपाराणी निकम यांनी मंजुरी देऊन निवड केली. दरम्यान सुनील मोदी आणि मुस्ताक मलबारी यांच्या निवडीला महायुतीकडून विरोध होणार असे बोलले जात होते. मात्र महायुतीच्या एकाही नगरसेवकांनी या दोघांच्याही नावाला विरोध न केल्यामुळे यांची निवड करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com