Kolhapur : अपुऱ्या इंधनसाठ्याच्या अफवेमुळं कोल्हापुरात गोंधळ! प्रत्येक वाहनांसाठी किती पेट्रोल-डिझेल मिळणार? जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

Kolhapur : नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळून केवळ आवश्यकतेनुसारच इंधन घेण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
Kolhapur Petrol Pump
Kolhapur Petrol Pump
Published on
Updated on

Kolhapur Petrol News : पेट्रोल-डिझेलच्या अपुऱ्या साठ्याच्या अफवेमुळं कोल्हापुरात वाहनचालकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी पंपांवर रांगा लावल्या आहेत. यामुळं इंधनाचा तात्पुरता असमतोल निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी महत्वाचे आदेश काढले आहेत. त्यानुसार, आता दुचाकी चालकांसाठी एकावेळी केवळ २०० रुपयांचं पेट्रोल मिळणार आहे. तर तीन व चार चाकींसाठी एकावेळी जास्तीत जास्त २००० रुपयांचं इंधन भरता येणार आहे. त्यामुळं नागरिकांनी आवश्यकतेनुसारच इंधन घ्यावं असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

Kolhapur Petrol Pump
Devendra Fadnavis: "...तर पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांना इथंच बसून टाचण्या टोचल्या असत्या"; श्रद्धा-अंधश्रद्धेवरुन मुख्यमंत्र्यांनी टोचले जनतेचे कान

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुरवठा शाखेकडून प्राप्त आदेशानुसार, कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. पण, सोशल मीडियावर पसरविण्यात आलेल्या अफवांमुळं नागरिकांकडून पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होत असून मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. ज्यामुळं मागणी व पुरवठा यामध्ये तात्पुरता असमतोल निर्माण झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, सार्वजनिकहिताच्या दृष्टीने आणि इंधनाचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 व जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून काही निर्बंध लागू केले आहेत.

Kolhapur Petrol Pump
Ramesh Hinge: “मंत्री, अधिकाऱ्यांची वर्दळ होती…”; अशोक खरातच्या पीएचा मोठा खुलासा

या आदेशानुसार आता दुचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त 200 रुपयांपर्यंत आणि तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त 2000 रुपयांपर्यंतच इंधन भरता येईल. कोणत्याही प्रकारच्या कॅन, बाटल्या किंवा ड्रममध्ये इंधन देण्यास सक्त मनाई करण्यात आली असून नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळून केवळ आवश्यकतेनुसारच इंधन घ्यावे, असं आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.

Kolhapur Petrol Pump
Satara ZP Election: साताऱ्यात 8 दिवसांतच दुसऱ्या 'ऑपरेशन लोटस'ची तयारी : शंभुराज-मकरंदआबांची पुन्हा शिवेंद्रराजे-जयकुमार गोरेंसोबत गाठ

रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना इंधन पुरवठ्यात प्राधान्य दिलं जाईल. तसंच, प्रत्येक पेट्रोलपंपानं आपल्याकडील शिल्लक साठा, प्राप्त झालेला साठा आणि मागणी केलेल्या साठ्याची माहिती दर्शनी भागातील फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक राहील. सर्व पेट्रोल पंपधारकांनी या आदेशाचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून, उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल. हा आदेश 25 मार्च 2026 पासून तात्काळ प्रभावानं लागू करण्यात आला असून तो 31 मार्च 2026 पर्यंत लागू राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com