Gokul Election : गोकुळ निवडणुकीवरून महायुतीत नवा वाद, बैठकीत डावलल्याने शिवसेना नेते संतप्त; दोन आमदार आणि माजी खासदार नाराज

Gokul Election Mahayuti Controversy : गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला असून शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी थेट इशारा दिल्याने महायुतीतील धुसफुसीची चर्चा सुरू झाली आहे.
Gokul Election
Gokul Electionsarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Gokul Election Row News : गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेली महायुतीतील धुसफूस नेत्यांच्या बैठकीनंतर थांबल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र गोकुळच्या बैठकीला शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना, आमदारांना डावल्यानंतर दोन विद्यमान आमदार, माजी खासदार चांगलेच संतापले आहेत. रविवारी दिवसभर या दोन आमदारांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न झाले. त्यामुळे महायुतीतील धुसफुस पुन्हा एकदा बैठकीला निमंत्रण न दिल्यामुळे वाढली आहे. त्यामुळे आज तातडीने शिवसेनेच्या नेत्यांची बैठक होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुती मधील नेत्यांची बैठक शनिवारी पार पडली. बैठकीला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, विनय कोरे यांच्यासह समित कदम उपस्थित होते.

या बैठकीत गोकुळ महायुतीच्या पॅनलचे नाव जाहीर करण्यात आले. मात्र या बैठकीला आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना निमंत्रित केले नसल्यामुळे निवडणुकीपूर्वीच गोकुळमधील वातावरण चांगलेच ढवळले आहे.

आमदार चंद्रदीप नरके आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे निर्णायक मते आहेत. शिवाय महायुतीचे गोकुळमधील प्रमुख नेते आहेत, असे असताना देखील दोघांनाही या बैठकीचे निमंत्रण दिले नव्हते. त्यावर आमदार चंद्रदीप नरके यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे उघड नाराजी व्यक्त केली.

Gokul Election
Gokul Election : गोकुळमध्ये कोणाला निवडून आणायचं? कोणाला पाडायचं? फार्म हाऊसवरील पार्टीत सगळं ठरलं!

शनिवारी रात्री उशिरापर्यंत ही नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू झाले. अखेर पालकमंत्री आबिटकर हे रात्री अकरा वाजता शिवाजी पेठ येथील आमदार चंद्रदीप नरके यांची घरी भेट घेऊन चर्चा केली.

काल दिवसभरात नाराज नेत्यांची भेट घेत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र आपल्याकडे निर्णय असून आम्हाला गृहीत धरू नका असा इशाराही काही नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला आहे.

Gokul Election
Gokul Election : 'सतेज पाटलांनी काय करावे ते त्यांनी ठरवावं, महायुतीच्या जागावाटप मुख्यमंत्री ठरवतील', मंत्री मुश्रीफांनी गोकुळचा विषय संपवला

दरम्यान या सर्व घडामोडीनंतर महायुतीमधील शिवसेना नेत्यांची बैठक गोकुळ संदर्भात होणार आहे. आज जिल्हा नियोजन समितीची बैठक असल्याने सर्वच आमदार खासदार या बैठकीला उपस्थित असणार आहेत. या बैठकीपूर्वी शिवसेनेच्या सर्व नेत्यांची बैठक होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com