
New Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आणि भाजपप्रणित एनडीए सरकार तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेत आली. पण यावेळी भाजपचं स्वबळावर सत्ता मिळवण्याचे मनसुबे धुळीस मिळाले. जोरदार मुसंडी मारत विरोधकांनी भाजप अडीचशेच्या आत आणि एनडीएला तीनशेच्या आत रोखण्यात यश आलं. भाजपला नितीशकुमार आणि चंद्राबाबू यांच्या टेकूवर सत्ता स्थापन करावी लागली. पण सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण केलेल्या मोदी सरकारला (Modi Government) मोठा धक्का बसला आहे.
आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील आणि भाजप प्रणित एनडीए आघाडीतून आणखी एका पक्षानं एक्झिट घेतली आहे. टी.टी.व्ही. दिनकरन यांच्या अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघमने (एएमएमके)एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा केली. त्यामुळे एनडीएची साथ सोडणारा एएमएमके हा दुसरा पक्ष ठरला आहे. हा मोदींसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
तामिळनाडूत विधानसभेच्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहे. या निवडणुकांच्या तोंडावरच भाजपला तामिळनाडूत दोन मोठे धक्के बसले आहेत. माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्यानंतर आता एएमएमके या पक्षानेही एनडीएतून (NDA) बाहेर पडण्याची घोषणा केल्यानं एनडीएचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
एएमएमकेच्या टीटीव्ही दिनाकरन यांनी माध्यमांशी संवाद साधतानाच 'काही लोकांच्या विश्वासघाताविरुद्ध ही चळवळ (एएमएमके) सुरू करण्यात आली होती. आम्हाला खात्री होती की, ते बदलतील, परंतु काहीही झालं नाही', असं म्हटलं.
तामिळनाडूमध्ये एनडीएचं नेतृत्व एआयएडीएमकेकडे आहे. 2023मध्ये वेगळे झाल्यानंतर, एआयएडीएमकेने एप्रिल 2025 मध्ये भाजपसोबत युती केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दिनाकरन यांना या सर्व राजकीय घडामोडीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हस्तक्षेप करतील अशी अपेक्षा होती, परंतु काहीही झालं नाही.
याचदरम्यान, एआयएडीएमके, विशेषतः पलानीस्वामी यांनी एएमएमकेला एनडीए आघाडीत सहभागी करुन घेण्यास विरोध केल्याचा आरोप दिनाकरन यांनी केला आहे. एकेकाळी भाजपचे कट्टर सहकारी असलेले दिनाकरन यांनी त्यांचा पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सल्ला मसलत केल्यानंतर डिसेंबरमध्ये नवीन युतीबाबत निर्णय जाहीर करेल असंही म्हटलं आहे. माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी यापूर्वी भाजपशी असलेली युती तोडण्याचा निर्णय घेतला आहे.
पीएमकेचे संघटनात्मक नेते रामदास आणि नेते अंबुमणी यांच्यात वाद असल्याने, पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए युतीत राहील की नाही, हे स्पष्ट नाही. दिनाकरन यांनी एनडीएमधून बाहेर पडण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे तामिळनाडूचं राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.
2026 मध्ये तमिळनाडू विधानसभा निवडणूकपुढील वर्षी होत असलेल्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत अम्मांचे कार्यकर्ते एकत्र येऊन मुख्यमंत्रीपदाचा योग्य उमेदवार देतील याची आम्हांला उत्सुकता होती. अम्मांचे कार्यकर्ते आमच्यात सामील होतील आणि अम्मांच्या पक्षाचे लोक यासाठी योग्य प्रयत्न करतील, अशी आम्हांला अपेक्षा असल्याचंही दिनाकरन यांनी सांगितलं.
मात्र, आता जेव्हा आम्ही या लोकांना विश्वासघात डोक्यावर घेऊन शहरात फिरताना पाहिले, तेव्हा आम्हाला आता कोणताही मार्ग नाही, ते बदलण्याची शक्यता नसल्याचं लक्षात आल्याचं विधानही टीटीव्ही दिनाकरन यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.