

कोल्हापूर शहरातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. कोल्हापूर शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच मोक्का अंतर्गत कारवाई झालेला संशयित सूरज साखरे याच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, कोल्हापूरातील फुलेवाडी रिंग रोड परिसर, नाना पाटील चौकाजवळ ही गोळीबाराची घटना घडली. अज्ञात हल्लेखोरांनी सूरज साखरे याच्यावर 6 गोळ्या झाडल्या असून त्यापैकी दोन गोळ्या साखरे याला लागल्याची माहिती समजत आहे.
या हल्ल्यात तो जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा, करवीर पोलीस आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. जखमी सूरज साखरे याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली असून त्याच्यावर मोक्काअंतर्गतही कारवाई झालेली आहे.
त्यामुळे हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, त्यामागे जुन्या वैमनस्याचा, टोळी संघर्षाचा किंवा इतर कोणता हेतू आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणात पोलिसांकडून अधिकृत माहिती येणे अद्याप बाकी असून तपास सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.