

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे.
आमदार सुरेश खाडे आणि खासदार विशाल पाटील यांच्यात प्रथमच आक्रमक भाषेत आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
या संघर्षाचा सर्वाधिक परिणाम मिरज पूर्व भागातील राजकारणावर होताना दिसत आहे.
Sangli News : नुकताच राज्यातील महानगरपालिकेंच्या निवडणुका झाल्या असून राज्यभर महायुतीचा डंका वाजला आहे. पण पश्चिम महाराष्ट्रात सत्ताधारी महायुतीला काँग्रेसने घाम फोडला. सत्ता जरी काँग्रेसच्या हातून गेली असली तरी भाजपला सत्तेपर्यंत जाताना दमछाक करावी लागली आहे. आता त्याच जोमाने काँग्रेस पुन्हा एकदा मैदानात उतरली असून जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि काँग्रेसमधील वाद आता समोर येताना दिसत आहे. असाच वाद मिरज तालुक्याच्या राजकारणात उफाळून आला असून काँग्रेस खासदार विशाल पाटील आणि भाजप आमदार सुरेश खाडे वाद रंगताना दिसत आहे.
मिरज तालुक्याच्या राजकारणात एरव्ही एकमेकांना सांभाळूनच बोलणारे आमदार सुरेश खाडे आणि खासदार विशाल पाटील यांच्यात या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच आक्रमक भाषेत हल्ले-प्रतिहल्ले होत आहेत. त्यामुळे मिरज पूर्व भागात राजकीय वातावरण तापले आहे.
आमदार खाडे यांनी आपल्या सर्व समर्थकांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ते कुटुंबीयांसह प्रचारासाठी ताकदीने मैदानात उतरले आहेत. गेल्या १६-१७ वर्षांत त्यांनी मतदारसंघासाठी आणलेल्या विकास निधीबाबत ते आठवण करून देत आहेत. ‘यापुढेही निधी हवा असेल तर भाजपलाच विजयी करा,’ असे आवाहन करताना ते आक्रमक भाषा वापरत आहेत.
त्याचवेळी ‘विरोधी काँग्रेस आघाडीकडे ना सत्ता आहे, ना नेता आहे,’ अशा शब्दांत ते टीका करत आहेत. वसंतदादा गटाचे मिरज पूर्व भागात परंपरागत वर्चस्व राहिले आहे. बाजार समिती, जिल्हा बँकेसह विविध सत्ताकेंद्रांत दादा गटाने मिरज पूर्व भागातील कार्यकर्त्यांना कायम संधी दिली आहे. मदन पाटील यांनीही या भागात कायम वर्चस्व ठेवले.
मात्र आता त्यांच्या मागे जयश्री पाटील भाजपवासी झाल्या असून दादा गटाचे कार्यकर्ते बाजूला पडले होते. विशाल पाटील यांनी या गटाची धुरा व्यक्तिशः हाती घेत उमेदवार निवडीपासून लक्ष घातले आहे.
दरम्यान आमदार खाडे यांच्या निधीच्या आव्हानाला उत्तर देताना खासदार विशाल पाटील म्हणाले, वसंतदादांनी चारवेळा राज्याचे नेतृत्व केले, इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशाचा पंतप्रधान कोण व्हावा, हे त्यांनी सुचवले. मात्र कधी अरेरावीची भाषा वापरली नाही.
मात्र नशिबाने आमदार झालेले लोकप्रतिनिधी बंदची भाषा करीत असल्याचा प्रतिहल्ला करत आहेत. पण आता त्यांना आपण जिल्हा परिषदेत दोनअंकी संख्या गाठू देणार नाही, असाही विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला आहे.
1. मिरज तालुक्यात नेमका कोणता वाद सुरू आहे?
आमदार सुरेश खाडे आणि खासदार विशाल पाटील यांच्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
2. हा वाद कोणत्या निमित्ताने उफाळून आला?
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हा वाद उफाळून आला आहे.
3. याआधी दोन्ही नेत्यांचे संबंध कसे होते?
याआधी दोघेही एकमेकांवर थेट टीका टाळत सांभाळून बोलत होते.
4. या संघर्षाचा परिणाम कुठे जाणवत आहे?
मिरज पूर्व भागात राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
5. या वादाचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
मतदारांचे ध्रुवीकरण होण्याची आणि प्रचार अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.