

कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस गटनेत्यांमध्ये परिवहन सभापती पदावरून तीव्र वाद झाला.
शारंगधर देशमुख आणि आदिल फरास यांच्यातील संघर्षात शिवसेनेने बाजी मारल्याचे समजते.
याच आठवड्यात समिती सभापतींची निवड होणार असून परिवहन सभापती पद महायुतीतील शिवसेनेला देण्याचे निश्चित झाले आहे.
kolhapur municipal corporation Political News : कोल्हापूर महानगरपालिकेतील महायुतीतील दोन मातब्बर गटनेत्यामध्ये एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा घडला होता इतकेच नव्हे तर समित्यावरील जागा वाटपावरून सुरू झालेल्या संघर्षाचा हा वाद महापौरांच्या बैठकीत देखील उफाळून आला होता. शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आदिल फरास यांच्यातील वाद टोकाचा बनला असताना त्यामध्ये शिवसेनेनेच बाजी मारली असल्याची माहिती आहे.
परिवहन सभापती वरून सुरू असलेला वादात शिवसेनेने सभापती पद मिळवल्याचे निश्चित झाल्याचे समजते. त्यामुळे देशमुखच फरास यांच्यावर वरचढ ठरले आहेत. याच आठवड्यातील समिती सभापतींची निवड होणार आहे. या निवडणुकीत परिवहन सभापतिपद महायुतीतील शिवसेनेला द्यायचे निश्चित झाल्याचे समजते.
राष्ट्रवादी काँग्रेसने देखील या पदाची मागणी केली आहे. त्यामुळे त्यांना सभापतिपद मिळाले नाही तर काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. महायुती अभेद्य राहणार की मिठाचा खडा पडणार याचे चित्र सभापतिपदांच्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. विविध समितींच्या सदस्यांची नियुक्ती गेल्या आठवड्यातील सर्वसाधारण सभेत झाल्या. स्थायी समिती सभापतिपद भाजपकडे जाणार आहे.तेथून उमेदवार कोण याची चर्चा सुरू आहे. विशाल शिराळे, राजनंदा महाडिक यांची नावे चर्चेत आहेत.
पण परिवहन, महिला व बालकल्याण समितीचे सभापतिपद कोणत्या पक्षाला मिळणार याचा अजून निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाच वर्षांत तीन पदे द्यायचे ठरले आहे. पण केंव्हा द्यायचे हे ठरले नसल्याचे समजते. ज्या- त्या वेळच्या स्थितीनुसार निर्णय घेतले जाईल, असे सांगितले जात होते. आता सभापतिपदाच्या अर्जाची तारीख जवळ आली तरी अजून त्याची कोणत्या पक्षाला द्यायचे हे ठरलेले नाही. शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेत्यांमध्ये सर्वसाधारण सभेपूर्वीपासून दोनदा जोरदार खडाजंगी झाली आहे. एकमेकाला बघून घेण्याची भाषा झाली आहे. त्यामुळे दोघांमधील वाद विकोपाला गेल्याचे दिसत आहे.
'परिवहन'मध्ये होऊ शकते समान संख्याबळ
स्थायी समिती सभापतिपद भाजपकडे असल्याने तिथे जरी महायुतीचे काठावर बहुमत असले तरी राष्ट्रवादी काही वेगळा निर्णय घेईल, असे वाटत नाही. पण परिवहन समितीत भाजपचे चार, शिवसेनेचे दोन, तर राष्ट्रवादीचा एक नगरसेवक असे सातचे संख्याबळ आहे. काँग्रेसचे पाच सदस्य आहेत. जर या समितीत राष्ट्रवादीने काँग्रेससोबत हातमिळवणी केली तर महायुती व कॉंग्रेसचे संख्याबळ सहा इतके समान होऊ शकते. अशावेळी चिठ्ठीतून सभापती निवड होऊ शकते. पण, भविष्यात महायुतीतील संधी राष्ट्रवादीला * मिळणार का? हा प्रश्न आहे.
या स्थितीत शिवसेनेने परिवहन सभापतिपद कोणत्याही स्थितीत सोडायचे नाही असे ठरवले आहे. त्यासाठी सत्यजित जाधव यांचे नाव निश्चित केले आहे. तर राष्ट्रवादीकडून हे पद मिळावे, म्हणून मानसी लोळगे यांचे महिला व बालकल्याण समितीत घातलेले नाव मागे घेतले. आता महिला बालकल्याणमध्ये राष्ट्रवादीचे सदस्य नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीचा तिथे सभापती व्हायचा म्हटले तरी होणार नाही. त्यामुळे शिवसेनेला संधी मिळू शकते. पहिल्या वर्षी राष्ट्रवादीला संधी मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे. या स्थितीत राष्ट्रवादी पुढील पदांचे आश्वासन घेणारी की वेगळी भूमिका घेते यावर पुढील राजकारण अवलंबून राहणार आहे.
1. वाद नेमका कशावरून झाला?
परिवहन समितीच्या सभापती पदाच्या वाटपावरून वाद निर्माण झाला.
2. कोणत्या दोन गटनेत्यांमध्ये संघर्ष झाला?
शिवसेनेचे शारंगधर देशमुख आणि राष्ट्रवादीचे आदिल फरास यांच्यात वाद झाला.
3. या वादात कोण वरचढ ठरले?
शिवसेनेने परिवहन सभापती पद मिळवत बाजी मारल्याची माहिती आहे.
4. निवडणूक कधी होणार आहे?
याच आठवड्यात समिती सभापतींची निवड होणार आहे.
5. या घटनेचा महायुतीवर काय परिणाम होऊ शकतो?
महायुतीतील अंतर्गत तणाव वाढण्याची शक्यता असून स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे तयार होऊ शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.