mahayuti conflict : तळकोकणात महायुतीत कुरघोडी, बड्या नेत्यांचे राजकीय करिअर धोक्यात; अपक्षांचा ‘ट्रेंड’ राजकीय दिशा बदलणारा

zilla parishad panchayat samiti election results politics : सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालानंतर येथे अपक्षांचा ‘ट्रेंड’ सुसाट असल्याचे समोर आले आहे.
zilla parishad panchayat samiti election results politics
zilla parishad panchayat samiti election results politicssarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल अनेक प्रस्थापित नेत्यांसाठी धक्कादायक ठरले.

  2. उमेदवार निवडीतील त्रुटी आणि महायुतीतील अंतर्गत मतभेदांचा मोठा फटका बसला.

  3. अपक्ष उमेदवारांचा वाढता ट्रेंड आगामी राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत देत आहे.

Sawantwadi : रुपेश हिराप

सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून देणारे ठरले आहेत. उमेदवार निवडीतील त्रुटी, इच्छुकांची नाराजी आणि महायुतीमधील अंतर्गत कुरघोडी यांचा मोठा फटका अनेक प्रस्थापितांना बसला. या निकालांमुळे तालुक्यातील अनेक मातब्बर नेत्यांचे राजकीय करियर धोक्यात आले आहे. अपक्षांचा तालुक्यात सुसाट सुटलेला ‘ट्रेंड’ आगामी राजकीय दिशा बदलणारा ठरू शकतो.

तालुक्यातील कोलगाव मतदारसंघामध्ये युतीमधील विसंवाद पराभवासाठी सर्वाधिक कारणीभूत ठरला. भाजपने मायकल डिसोजा यांना डावलून महेश सारंग यांना उमेदवारी दिली होती. परिणामी, डिसोजा यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत सारंग यांचा पराभव केला. डिसोजा यांच्यासोबत असलेली कार्यकर्त्यांची भक्कम टीम आणि ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी असलेले त्यांचे जुने संबंध त्यांच्या विजयासाठी पूरक ठरले. सारंग यांच्यासाठी हा पराभव मोठा धक्का मानला जात आहे.

इन्सुली आणि माडखोल मतदारसंघांतही जनतेने प्रस्थापितांना नाकारून नवीन आणि उमद्या चेहऱ्यांना कौल दिला आहे. इन्सुलीत शिंदे शिवसेनेच्या अंतर्गत नाराजीमुळे शावियर फर्नांडिस यांचा पराभव झाला आणि अपक्ष नितीन गावडे विजयी झाले. माडखोलमध्ये भाजपच्या सुप्रिया मडगावकर यांच्या उमेदवारीवर नाराज असलेल्या युवा वर्गाने एकत्र येत अपक्ष शिवानी नाईक यांना विजयी केले. माजगावमध्येही ओबीसी उमेदवाराच्या मुद्द्यावरून नाराजी निर्माण झाल्याने भाजपला पंचायत समितीची एक जागा गमवावी लागली आणि तिथे अपक्ष जितेंद्र गावकर यांनी बाजी मारली; मात्र जिल्हा परिषदेच्या जागेवर विक्रांत सावंत यांनी एकतर्फी विजय खेचून आणून जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा मान मिळवला.

zilla parishad panchayat samiti election results politics
Mahayuti Conflict : अखेर महायुतीतील मोठ्या वादावर तोडगा निघाला : भाजपची शिवसेना, राष्ट्रवादीसोबत डील ठरली

आरोंदा जिल्हा परिषद जागेवर शिंदे शिवसेनेच्या सुदन कवठणकर यांनी विजय मिळविला असला, तरी सातार्डा पंचायत समितीमध्ये ठाकरे शिवसेनेचे उदय पारिपत्ये यांनी मुसंडी मारली. सुदन कवठणकर यांच्या विरोधात शर्वाणी गावकर यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती; मात्र या ठिकाणी कवठणकर यांना युवा वर्गाचा असलेला पाठिंबा आणि कार्यकर्त्यांनी अहोरात्र घेतलेली मेहनत त्यांच्या विजयाला फायद्याची ठरली.

न्हावेली पंचायत समितीच्या जागा वाटपात भाजपने कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्याचा परिणाम निकालात उमटला. तेथील भाजप कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेच्या शरद धाऊसकर यांना पाठिंबा देत त्यांना विजयी केले; मात्र मळेवाडी जिल्हा परिषदेत माळेवाड पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या दोन्ही जागांवर भाजपने कमळ फुलवले. या ठिकाणी भाजपची संघटनात्मक फळी फायद्याची ठरली.

दुसरीकडे बहुचर्चित तळवडे मतदारसंघामध्ये ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभाप्रमुख रुपेश राऊळ यांना जनतेने नाकारल्याचे दिसून आले. या ठिकाणी संदीप गावडे अडीच हजारांच्या मताधिक्याने निवडून आले. गावडे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि संघटनात्मक बाबी विचारात घेऊन केलेला प्रचार व नियोजन या सर्वांचा फायदा त्यांना विजयाच्या रूपाने झाला.

प्रस्थापितांना जनतेचा थेट इशाराच!

या निवडणुकीत स्थानिक आमदार आणि मंत्री दीपक केसरकर यांनी प्रचार यंत्रणेकडे पूर्णपणे फिरवलेली पाठ आणि त्याचा परिणाम शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांना पराभवाच्या रूपाने बसला. हे एक प्रमुख कारण मानले जात आहे. याचा थेट फायदा विरोधकांना आणि अपक्षांना झाला. एकूणच सावंतवाडीचा हा निकाल म्हणजे प्रस्थापितांना जनतेने दिलेला इशारा मानला जात आहे. गटबाजी, घराणेशाही आणि कार्यकर्त्यांच्या भावनांकडे केलेले दुर्लक्ष यामुळे भविष्यातील राजकीय वाटचाल बिकट असल्याचे या निकालांनी स्पष्ट केले आहे.

zilla parishad panchayat samiti election results politics
Mahayuti internal conflict : महायुतीमधील धुसफूस शिगेला! मुनगंटीवार, झिरवाळ, बडोले यांची नाराजी चव्हाट्यावर!

FAQs :

1. निकाल धक्कादायक का ठरले?
अनेक प्रस्थापित आणि मातब्बर नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

2. महायुतीला फटका का बसला?
अंतर्गत कुरघोडी आणि उमेदवार निवडीतील चुका यामुळे नुकसान झाले.

3. अपक्षांचा ट्रेंड काय दर्शवतो?
मतदारांनी पारंपरिक पक्षांऐवजी अपक्ष उमेदवारांवर विश्वास दाखवला आहे.

4. या निकालाचा पुढील राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
तालुक्यातील सत्ता समीकरणे बदलू शकतात आणि नव्या आघाड्यांची शक्यता वाढू शकते.

5. प्रस्थापित नेत्यांचे भविष्य काय?
अनेक नेत्यांच्या राजकीय करिअरवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com