

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला अपयश आल्यानंतर अनेक निष्ठावंत शिवसैनिकांनी शिवसेनेला राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या गटबाजी, एकाधिकारशाहीमुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या अस्तित्व धोक्यात आले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर अनेक निष्ठावंत शिवसैनिक शिंदे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्या दहा ते बारा दिवसात थेट मातोश्री पर्यंत कनेक्ट असणारे शिवसैनिक स्थानिक पदाधिकाऱ्यांवर नाराजी दर्शवत राम राम ठोकणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे केवळ ठाकरेंची शिवसेना ही पदाधिकाऱ्यापुरती शिल्लक राहण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काँग्रेस सह भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील पदाधिकाऱ्यांची एकी दिसली. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी देखील स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या आणि पक्षाच्या अस्तित्वासाठी स्वतः स्वतंत्र निवडणूक लढवली. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेने कोल्हापूर महापालिकेत मात्र काँग्रेस सोबत युती केली.
मुळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्वतःचे अस्तित्व गमावलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला कोल्हापूर महानगरपालिकेत अपेक्षित जागा मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र त्या ठिकाणी देखील काँग्रेसने तोंड दाबल्याने ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ पाच जागाच पदरात पडल्या. त्याला ठाकरेंच्या शिवसेनेतील उपनेते संजय पवार, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, संपर्कप्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख सुनील मोदी हेच जबाबदार असल्याचा मधल्या फळीतील कार्यकर्त्यांचा आरोप आहे.
स्वतःचे अस्तित्व ठेवण्यासाठी काँग्रेस पुढे दबाव वाढवला कदाचित निष्ठावंत शिवसैनिकांना आणखीन जागा मिळाल्या असत्या. मात्र वरिष्ठ स्तरावरूनच आणि जिल्ह्यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मर्जीनुसारच जागावाटप झाल्याने अनेक निष्ठावंत. केवळ कोल्हापूर महानगरपालिकेत एकच नगरसेवक निवडून आल्याने उरलेसुरले पदाधिकारी देखील स्थानिक पदाधिकाऱ्यांवर नाराज आहेत. येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसात हे शिवसैनिक देखील शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे सांगितले जाते.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे सेनेला दोन अंकी जागा मिळतील अशी अपेक्षा होती. या संदर्भात दबाव गट तयार करून ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला जागा वाटपा संदर्भात सकारात्मक केले होते. मात्र शेवटच्या क्षणी केवळ आपल्या पुरताच विचार नेतृत्वाने केल्याने निष्ठावंत शिवसैनिकांची फरपट झाली. त्यांच्यावर अन्याय झाल्याने शहर प्रमुख राजू पाटील, महिला संघटिका स्मिता सावंत, पुनम फडतरे, शशिकांत बिडकर यांनी अपक्ष निवडणूक लढवली.
महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला अपयश मिळाल्यानंतर अंतर्गत गटबाजीतून नाराज झालेले शहराध्यक्ष सुनील मोदी यांनी एकाला दिवशीच राजीनामा देत ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का दिला. मात्र वरिष्ठांच्या समजुतीनुसार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा सक्रिय झाले. मात्र जिल्ह्यातील नेतृत्वांवर खाजगीत नाराजी व्यक्त दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सुनील मोदी हे देखील अक्षय पातळीवर सक्रिय राहणार का हे देखील महत्त्वाचे आहे.
अनिल पाटील- उपशहरप्रमुख, उबाठा गट
धनाजी दळवी - शहरप्रमुख, उबाठा गट फेरीवाले सेना
सुशील भांदीगरे - उपशहरप्रमुख, उबाठा गट
सागर गायकवाड - उपशहरप्रमुख, उबाठा गट बंडा लोंढे - उपनजल्हाप्रमुख, युवासेना उबाठा गट
विशाल ससे - विभागप्रमुख, उबाठा गट अक्षय कुकडे - शाखाप्रमुख, उबाठा गट
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.