Kolhapur Political News : वाढला टक्का, कोणाला बसणार धक्का, लोकसभेच्या आडून विधानसभेवर नजर; काय असणार गणित ?

Loksabha Election 2024 : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील चंदगड, करवीर या विधानसभा मतदारसंघांत 2019 च्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे. ही वाढलेली मतदानाची टक्केवारी काय सूचित करते याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
Kolhapur Politics
Kolhapur PoliticsSarkarnama

Kolhapur News : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात झाले आहे. यंदा कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीने पार पडली. अत्यंत इर्षेने झालेल्या या निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 71.15%? मतदान झाले तर हातकणंगलेमध्ये 69% मतदान झाले. वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार हे चार जून रोजी कळणार आहे.

मात्र, लोकसभेच्या आडून कोणी कोणाचा गेम केला याची चर्चा सध्या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील चंदगड आणि राधानगरी लोकसभा मतदारसंघात याबाबत अनेक चर्चा आहेत. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात इचलकरंजी आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.(Kolhapur Political News)

Kolhapur Politics
BJP Anup Dhotre News : निकालाआधीच अनुप धोत्रे 'खासदार'? उतावळ्या समर्थकांची अतिघाई; अकोल्यात 'बॅनरबाजी'!

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील चंदगड, करवीर या विधानसभा मतदारसंघांत 2019 च्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे. हातकणंगले मतदारसंघातील शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ, इस्लामपूर या विधानसभा मतदारसंघांची टक्केवारी पूर्वीच्या तुलनेत वाढली आहे.

ही वाढलेली मतदानाची टक्केवारी काय सूचित करते याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवाय स्थानिक राजकीय संदर्भ देत अनेक राजकीय चर्चेला उकळ्या फुटल्या आहेत. मतदानाची वाढलेली टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार हे 4 जूनला स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यातील लोकसभेची निवडणूक यंदाही चुरशीची आणि लक्षवेधी ठरली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि शिवसेनेचे संजय मंडलिक अशी थेट लढत झाली. हातकणंगलेमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सत्यजित पाटील, शिवसेनेचे धैर्यशील माने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी (Raju Shetti) अशी तिरंगी लढत झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात चंदगड विधानसभा मतदारसंघात 2019 च्या तुलनेत तीन टक्के मतदान वाढले आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून तुल्यबळ प्रचारक लागल्याने मतदानाचा टक्का वाढल्याचे सांगण्यात येते. मात्र वास्तविक पाहता श्रीमंत शाहू महाराज (Shrimant Shahu Maharaj) यांच्याबद्दल असणारे आकर्षण आणि मंडलिक यांच्याबाबत असणारी नाराजी यांचे केंद्रबिंदू असू शकते. शिवाय विधानसभा निवडणुकीत पडद्यामागून कोणी मदत केली का याचा शोध कायम राहिल.

तर करवीरमध्ये 4.26 टक्क्यांची वाढ आहे. करवीरमध्ये काँग्रेसचे दिवंगत आमदार पी. एन. पाटील, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) या तिघांचेही गट आहेत. त्यामुळे गत निवडणुकीच्या तुलनेत वाढलेली चार टक्के मते कोणाच्या गटाची आहेत, यावर विजयाची समीकरणे अवलंबून आहेत. राधानगरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे पारडे जड असली तरी शाहू महाराज यांच्याबाबत आदर कायम आहे. शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार के पी पाटील हे महायुतीचे नेते आहेत. बिद्री कारखाना निवडणूक निमित्ताने आमदार सतेज पाटील यांची के पी पाटील यांना झालेली मदत ही तितकीच महत्त्वाची आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात यंदा मतदानाची १.३२ टक्क्यांची वाढ आहे. शिरोळमध्ये १.६०, तर इस्लामपूरमध्ये ३.४३ टक्के वाढ आहे. इचलकरंजीमध्येही मतदानाची वाढलेली टक्केवारी कोणाचा फायदा करून देणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. इस्लामपूरमध्ये महायुतीमधील नेत्यामध्ये विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सूरू असलेली चुरस चर्चेचा विषय ठरत आहे.

इचलकरंजी मतदारसंघात आमदार प्रकाश आवाडे आणि धैर्यशील माने यांच्याबाबत सुरवातीला असलेली नाराजी भूमिका आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर आवाडे यांनी घेतलेली भूमिका लोकांना न पटलेली आहे. त्यामुळे वाढलेल्या मतदान टक्केवारीचा फायदा कोणाला होणार हे पाहणे महत्वाचे आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Kolhapur Politics
Beed Breaking News : राष्ट्रवादीच्या 'बूथ कॅप्चरिंग'च्या आरोपाची दखल, निवडणूक आयोगाच्या जिल्हाधिकाऱ्यांना 'या' सूचना

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com