Shivsena News: एका रात्रीत जिल्हाप्रमुखाचे नाव बदललं, कोल्हापुरात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा बॉम्ब फुटणार

Uddhav Thackeray Shivsena News : जिल्हाप्रमुख पदावर काल रात्रीपर्यंत हर्षल सुर्वे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, एका रात्रीत नाव बदलल्याने पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांसह दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते देखील नाराज आहेत. शेजारीच बसून दुसऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांसोबत आम्ही पक्षात काम कसे करायचे, असा सूर निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये आज उमटला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर कोल्हापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कोल्हापूर उत्तर, दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघातील जिल्हाप्रमुख पदावरून चांगलाच अंतर्गत संघर्ष पाहायला मिळाला. या लढाईत शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी जिल्हाप्रमुख पद मिळवले. मात्र, इंगवले यांच्या नावाला पक्षातीलच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवत नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे.

जिल्हाप्रमुख पदावर काल रात्रीपर्यंत हर्षल सुर्वे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, एका रात्रीत नाव बदलल्याने पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांसह दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते देखील नाराज आहेत. शेजारीच बसून दुसऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांसोबत आम्ही पक्षात काम कसे करायचे, असा सूर निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये आज उमटला आहे. शहरासह ग्रामीण भागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी देखील आपल्याला आलेला अनुभव बैठकीत व्यक्त केला. आज शहरातील मध्यवर्ती एका पेठेत प्रमुख नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांची उपनेते पदी नियुक्ती झाल्यानंतर कोल्हापू (Kolhapur Shivsena) शहर दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघातील जिल्हाप्रमुख पद रिक्त होते. जिल्हाप्रमुख पदासाठी राजू यादव, रविकिरण इंगवले, हर्षल सुर्वे, अवधूत साळोखे यांनी या पदासाठी फिल्डिंग लावली होती.

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून प्रमुख पदासाठी आपल्याच नावाची वर्णी लागेल. यासाठी प्रयत्न केले होते. शिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी देखील जिल्हाप्रमुख पदासाठी नावे सुचवली होती. त्यामुळे सहाजिकच सर्वांच्या मर्जीतील जिल्हाप्रमुख द्यावा अशी मागणी दुसरीकडे जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केली होती.

Uddhav Thackeray
Raj-Uddhav Thackeray: 'हिंदीसक्तीची घंटा'... ! ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण कूस बदलणार का ?

त्यानुसार कालपर्यंत हर्षल सुर्वे यांचे नाव जिल्हाप्रमुख पदासाठी आघाडीवर होते. याबाबतची पूर्वकल्पना काही नेत्यांनी इतर नेत्यांना दिली होती. मात्र एका रात्रीत जिल्हा प्रमुखांचे नाव बदलले. त्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कोल्हापुरातील पक्षात खळबळ माजली आहे. तर पदाधिकाऱ्यांना विश्वासातच न घेता जिल्हाप्रमुख पदाचे नाव जाहीर केल्याने निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. त्या संदर्भात शहरातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शहरातील एका पेठेत बैठक झाली.

या बैठकीत जिल्हाप्रमुख पदाचे नाव जाहीर होताच त्याबाबत नाराजी व्यक्त झाली. गेल्या अनेक वर्षे आपण पक्षाशी एकनिष्ठ असून निष्ठावंतांची व्याख्या निष्ठ नेत्यांना कळत नसेल, तर त्या निष्ठावंतांचा अर्थ काय? स्पष्टीकरण आम्हा शिवसैनिकांना द्याव अशी भावना काही शिवसैनिकांनी व्यक्त केली. तर त्याने आपल्याच पक्षातील प्रदाधिकाऱ्यांची बदनामी ही लोकांच्याकडून होत असेल, त्यांनाच जिल्हाप्रमुख पद मिळत असेल, तर हे निष्ठावंत शिवसैनिकांसाठी दुर्दैवी आहे. असं मत देखील काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

Uddhav Thackeray
Medha Kulkarni News: एकाच पत्रकार परिषदेत भाजपच्या मेधा कुलकर्णी संतापल्या अन् रडल्याही; पेटलेल्या नामांतराच्या वादावर म्हणाल्या...

दरम्यान, हे प्रमुख पदाधिकारी या संदर्भात त्या दोन दिवसात भूमिका स्पष्ट करणार आहेत. झालेल्या निवडीवर नाराजी व्यक्त करत वरिष्ठांसोबत चर्चा करत त्या संदर्भात दाद मागितली आहे. त्यावर निर्णय न झाल्यास त्यात दोन दिवसात काही प्रमुख पदाधिकारी आपली भूमिका स्पष्ट करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे काही दिवसात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गेला महिन्या दीड महिन्यांपासून जिल्हाप्रमुख पदासाठी माझे नाव आघाडीवर होते. मला महापालिका निवडणुकीत नाराजी नको म्हणून प्रमुख पद प्रलंबित ठेवले असल्याचे सांगितलं. पण काल अचानक या निवडी जाहीर करण्यात आल्या. पक्षातीलच लोकांच्याकडून बदनामी होत असेल तर अशा व्यक्तींसोबत मी काम करू शकत नाही. प्रतिक्रिया कोल्हापूर दक्षिण शहर प्रमुख हर्षल सुर्वे यांनी सरकारनामाशी बोलताना दिली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com