Kolhapur Election : लाडक्या बहीणी कोणाला तारणार? जिल्ह्यातील महिला मतदारांची टक्केवारी वाढली

Kolhapur Vidhan Sabha Election : एकंदरीतच महायुतीला उजवा कौल असणार की महाविकास आघाडीला पूरक असणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
Vidhan Sabha Election 2024
Vidhan Sabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील अंतिम आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज जाहीर केली. जाहीर झालेल्या आकडेवारीत लाडक्या बहिणीने उत्स्फूर्तपणे मतदानाला प्रतिसाद दिला आहे. गतवर्षीपेक्षा यंदा महिलांचा मतदान करण्यात टक्केवारी अधिक आहे. जिल्ह्यात एकूण मतदान ७६.६३ टक्के झाले. करवीर विधानसभा मतदारसंघात महिलांचे सर्वाधिक ८३.६८ टक्के मतदान झाले. महिलांच्या वाढलेल्या टक्क्यांमुळे प्रस्थापितांना धक्का बसणार आहे शिवाय लाडक्या बहिणींचा इम्पॅक्ट अधिक जाणवलेला दिसत आहे. एकंदरीतच महायुतीला उजवा कौल असणार की महाविकास आघाडीला पूरक असणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

जिल्हा प्रशासनाकडून अधिकृत आकडेवारी आज जाहीर करण्यात आली. राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात ७६.२५ टक्के इतके झाले. दिवसभरात घेतलेल्या आढाव्यानुसार जिल्ह्यात महिलांच्या टक्केवारीचे प्रमाण वाढलेले दिसते. महायुतीने शेवटच्या चार महिन्यात काढलेले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रभाव महिलांच्यावर अधिक असल्याचे जाणवते. मात्र प्रत्यक्षात किती लाडक्या बहि‍णीने महायुतीला आशीर्वाद दिला हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र त्यांची वाढलेली आकडेवारी ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना धडकी भरवणारी आहे. एकंदरीत पाहता पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या मतदानाची टक्केवारी ही जवळपास आहे.

Vidhan Sabha Election 2024
Dinvishesh 22 November : ... म्हणून आजचा दिवस आहे महत्त्वाचा!

मतदारसंघातील पुरुष आणि महिलांचे झालेले मतदान

चंदगड

पुरुष- १,२१,७७४

महिला- १,२३,९१८

एकूण- २,४५,६९५

राधानगरी

पुरुष- १,४०,३१५

महिला-१२९३६५

एकूण -२६९६८९

Vidhan Sabha Election 2024
Sanjay Raut : "याचा अर्थ आम्ही जिंकतोय…" एक्झिट पोलचा अंदाज अन् अपक्षांना ऑफर; राऊतांनी टायमिंग साधलं

कागल

पुरुष -१४३१६९

महिला-१४०३९५

एकूण- २८३५६८

कोल्हापूर दक्षिण -

पुरुष-१४२७०७

महिला-१३९००७

एकूण- २८१७४३

Vidhan Sabha Election 2024
Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधात डॉक्टर्स आक्रमक; थेट सोनिया गांधींना पत्र, काय आहे प्रकरण?

करवीर

पुरुष- १४४९०२

महिला- १३१३४३

एकूण -२७६२४५

उत्तर

पुरुष-१००५९७

महिला - ९७०५९

एकूण-१९७६६६

Vidhan Sabha Election 2024
Bachchu Kadu : काय 'कॉन्फिडंट' आहे, बच्चू कडूंचा! एवढ्या जागा निवडून येणार, महाशक्ती राज्यात टॉपवर राहणार ...पाहा VIDEO

शाहूवाडी

पुरुष-१२५६२०

महिला-११६३६३

एकूण-२४१९८७

हातकणंगले

पुरुष-१३६०५५

महिला-१२५१४५

एकूण-२६१२१५

Vidhan Sabha Election 2024
BJP Booth Exit Poll : भाजपच्या बूथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना धक्का, मिळू शकतात एवढ्या जागा

इचलकरंजी

पुरुष-१११९१६

महिला-१०५९२७

एकूण-२१७८५३

शिरोळ

पुरुष-१३०५०६

महिला-१२६४८८

एकूण-२५६९९६

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com