Dr. Indrajeet Mohite : ‘कृष्णा’चा निकाल फिरविणारा नेता कुणाच्या पारड्यात वजन टाकणार : सत्ताधारी-विरोधकांसह विश्वजित कदमांनाही निर्णयाची उत्सुकता!

Krishna Sugar Factory Election 2026 : कृष्णा साखर कारखाना निवडणुकीत डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्यांच्या निर्णयामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Dr. Indrajeet Mohite
Dr. Indrajeet Mohite Sarkarnama
Published on
Updated on

Karad, 23 May : कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यात सर्वाधिक चर्चा कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या भूमिकेची आहे. ‘कृष्णा’च्या आजवरच्या इतिहासात आणि मोहिते-भोसले गटाच्या राजकारणात डॉ. मोहिते वजनदार आणि तत्त्वनिष्ठ नाव आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत ते कोणाची पाठराखण करतात? याकडे सभासदांसह सत्ताधारी आणि विरोधकांचेही डोळे लागले आहेत. काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांचाही गट त्याकडे लक्ष ठेऊन आहे. डॉ. मोहितेंची भूमिका निवडणुकीचे चित्र बदलू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे (Krishna Sugar Factory ) अध्यक्ष म्हणून डॉ. मोहिते यांनी २००५ ते २०१० या काळात काम पाहिले. त्या काळात कारखान्यात सहवीज निर्मितीसारखे प्रयोग राबवले गेले. त्यासोबत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे विश्वस्त, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आणि डिस्टिलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.

डॉ. इंद्रजित मोहिते (Dr. Indrajit Mohite) यांच्या कार्यकाळात धोरणात्मक निर्णय, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासणारे धोरण आणि कारखान्याची आर्थिक घडी बसवण्यासाठीचे प्रयत्न आजही स्मरणात आहेत. कृष्णाच्या राजकारणात मोहिते आणि भोसले गटांमधील संघर्ष सर्वश्रुत होता. त्यातून कारखान्याची हानी टाळण्यासाठी दोन्ही गटांचे मनोमिलन घडवून आणण्यात डॉ. मोहिते यांचा सिंहाचा वाटा होता. मनोमिलनानंतर अनेक राजकीय चढ-उतार आले, सत्तासमीकरणे बदलली. मात्र, डॉ. मोहिते यांनी तत्त्व सोडली नाहीत.

कृष्णा काखान्याच्या यंदाच्या निवडणुकीत एकीकडे सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेल, तर विरोधात कृषी महर्षी आबासाहेब मोहिते यांचे पॅनेल ताकदीने मैदानात उतरले आहेत. सत्ताधाऱ्यांना तगडे आव्हान देण्यासाठी जुळणी सुरू असल्याने राजकीय तडजोडींनाही महत्त्व आले आहे.

Dr. Indrajeet Mohite
Congress Dispute : ओसाड गावच्या पाटीलकीवरून काँग्रेसमध्ये वाद पेटला : पैसे घेऊन जिल्हाध्यक्ष नियुक्तीचा आरोप, सपकाळ हटावचा नारा

दोन्ही आघाड्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे डॉ. मोहिते नेमकी काय भूमिकेवर बऱ्याच राजकीय घडामोडी अवलंबून आहेत. डॉ. मोहितेंचा पाठिंबा ज्या बाजूला असेल, त्यांचे पारडे जड होणार आहे. माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या कडेगाव तालुक्यातील गटालाही त्यांच्या निर्णयाचे वेध लागले आहेत.

Dr. Indrajeet Mohite
Karad Politic's : साताऱ्याची राजकीय कॅप्टनशीप कराडकडे : तीन मोठ्या पक्षांची स्ट्रॅटेजी ठरणार एकाच तालुक्यात!

दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार : डॉ. मोहिते

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित माेहिते म्हणाले, सध्या मी बाहेरगावी असून येत्या दोन दिवसांत कऱ्हाडला येत आहे. कृष्णा कारखान्यात दोन्ही पॅनेलने अर्ज भरले आहेत. त्यात कोणाला उमेदवारी दिली आहे. त्याची माहिती घेऊन सभसदांशी चर्चा करून माझी भूमिका जाहीर करणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com