Solapur BJP Politics : सोलापूरसाठी लक्ष्मण ढोबळेंची मोर्चेबांधणी सुरू; भाजपच्या निर्णयाकडे लक्ष

Laxman Dhoble, Adv. Komal Dhoble : काँग्रेसकडून प्रणीती शिंदेंचे नाव, तर भाजपकडून डझनभर इच्छूक
Adv. Komal Dhoble Laxman Dhoble
Adv. Komal Dhoble Laxman DhobleSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur Political News : लोकसभा निवडणुकीची महायुतीतील सर्व घटक पक्षांनी तयारी सुरू केलेली आहे. यंदा भाजप सोलापूर लोकसभेसाठी नवा चेहरा देण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. अद्याप भाजपने सोलापूरसाठी उमेदावरीबाबत भाष्यही केलेले नाही. असे असतानाही माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंनी संक्रातीचा मुहुर्तावर मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसून येत आहे.

पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षाकडून तयारी सुरू झाली. सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार म्हणून आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) या एकमेव नावाची चर्चा आहे. भाजपने मात्र अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा झाली नसली तरी डझनभरापेक्षा अधिक जण इच्छुक आहेत.

Adv. Komal Dhoble Laxman Dhoble
Udhhav Thackeray : उद्धव ठाकरेंचे 'इटालियन शक्ति'समोर लोटांगण; भाजपने सगळेच काढले

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वर यात्रेच्या अक्षता सोहळ्यासाठी सर्वच राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. सिद्धेश्वर रामेश्वराकडे आपल्या आगामी राजकीय वाटचालीसाठी त्यांनी साकडे घातले. यात भाजप प्रवक्ते लक्ष्मण ढोबळे (Laxman Dhoble) यांचाही सहभाग होता. त्यांनी आपल्या कन्येसह बाराबंदी वेशात अक्षता सोहळ्याला हजेरी लावली होती. त्यादरम्यान त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख यांचीही भेट घेत हितगूज केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोलापूरमधून काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. आता भाजप कुणाच्या नाव जाहीर करणार याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, संक्रातीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या अक्षता सोहळ्यात ढोबळेंनी हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत त्यांना यंदाची संक्रात गोड ठरणार का ? असे राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Adv. Komal Dhoble Laxman Dhoble
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : ठाकरेंच्या 'सफाई'चा शिंदेंनी हिशोब चुकता केला; म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Amol Shinde-Vijaykumar Deshmukh-Chandrakant Patil
Praniti Shinde
Yavatmal DCC Bank .jpg
Praniti Shinde-Jaykumar Gore
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com