Siddhi Kadam : ‘सिद्धी कदमांची उमेदवारी म्हणजे नुरा कुस्ती, डमी उमेदवार’; मोहोळच्या नाराज नेत्यांनी घेतली पवारांची भेट...

Mohol Assembly Election : सिद्धी यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविण्यासाठी मोहोळ तालुक्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांनी बारामती गाठून गोविंद बागेत शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमाशी बोलताना गायकवाड यांनी हा इशारा दिला आहे.
Siddhi Kadam
Siddhi KadamSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 28 October : सिद्धी रमेश कदम यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीतील शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि मोहोळ तालुका संघर्ष समितीच्या सर्वच नेत्यांनी विरोध दर्शविली आहे. मोहोळमधील नेत्यांनी बारामती गाठून सिद्धी कदम यांची उमेदवारी बदलावी, अशी मागणी केली आहे.

सिद्धी कदम यांची डमी उमेदवारी आहे, अशी चर्चा मोहोळ मतदारसंघात असून उमेदवार न बदलल्यास आम्हालाही वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दीपक गायकवाड यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मोहोळ मतदारसंघासाठी (Mohol Constituency) माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम (Siddhi Kadam) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सिद्धी यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविण्यासाठी मोहोळ तालुक्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांनी बारामती गाठून गोविंद बागेत शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली.

त्यानंतर माध्यमाशी बोलताना गायकवाड यांनी हा इशारा दिला आहे. या शिष्टमंडळात गायकवाड यांच्यासह नागनाथ क्षीरसागर, सीमा पाटील, उमेश पाटील, सोमेश क्षीरसागर यांचा समावेश होता.

दीपक गायकवाड म्हणाले, मोहोळमध्ये शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद आहे. त्यानंतरही मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला (NCP SP) सुटला. त्याबाबत आम्हाला यतकिंचितही दुःख नाही. पण राष्ट्रवादीने योग्य उमेदवार दिला असता तर आमचं काही म्हणणं नव्हतं.

मात्र, जो उमेदवार असणार आहे, त्याची स्वतःची किमान दहा हजार मते असायला हवीत. काँग्रेस, राषट्रवादी आणि शिवसेनेची मते ही कोणीही उमेदवार उभा राहिला त्यांना पडतील. पण उमेदवारीची स्वतःची बेगमी लागते, ती कुठे आहे?

Siddhi Kadam
Malshiras Constituency : मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात फडणवीसांचा पठ्ठ्या भिडणार पवारांच्या जानकरांना!

मी शिवसेनेचा जबाबदार पदाधिकारी आहे. बळीराम साठे यांच्यासारखे जबाबदारी नेते आमच्यासोबत आहेत. उमेश पाटील, मनोहर डोंगर, विजयराज डोंगरे, मनाजी माने, रमेश बारसकर ही मंडळीही आमच्यासोबत आहेत. मतदारसंघातील जबाबदारी व्यक्तींनी सांगूनही मोहोळ मतदारसंघातील उमेदवारामध्ये बदल होत नसेल तर ते चुकीचे ठरेल.

चर्चेत असणाऱ्या नावपेक्षा वेगळं नाव कुठून आलं?. मोहोळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दिलेला उमेदवार हा डमी आहे. ही नुरा कुस्ती आहे, असे मोहोळ मतदारसंघातील जनतेचा समज झालेला आहे, असा दावाही गायकवाड यांनी केला.

ते म्हणाले, मोहोळमधील कुस्ती नुरा करायची की काय? हे शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवावे. साहेबांच्या दारात मी वाईट बोलणं योग्य नाही. पण, तरीसुद्धा आम्ही ऐकणार नाही, चुकीची गोष्टी आम्ही लादून घेणार नाही. हाच उमेदवार कायम राहणा असेल तर आम्हालाही वेगळं काहीतरी दाखवावं लागणार आहे. कारण, आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, हे वरिष्ठांनी लक्षात घेतले पाहिजे.

आम्ही राजन पाटील विरोधक

नागनाथ क्षीरसागर म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीत मला ७० हजार मते मिळाली आहेत. लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या तीन अशा पाच निवडणुका मी लढवलेल्या आहेत. आम्ही पूर्वीपासून भाजप शिवसेनेचे कट्टर समर्थक आहोत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात निवडणुका लढवल्या आहेत. राजन पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून आम्ही आतापर्यंत काम केलेले आहे.

Siddhi Kadam
Rajendra Raut : आमदार राजेंद्र राऊतांना अवघ्या 18 दिवसांत बदलावा लागला निर्णय

बाहेरचे लोक उभं राहणार असतील कसं चालेल?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बाहेरचा उमेदवार देण्यात आलेला आहे, त्यांचा मतदारसंघाशी काय संबंध आहे. बाहेरचे लोक चार दिवसांत येऊन उभे राहणार असतील तर ते कसं काय चालेल. त्यामुळे मी माझा मुलगा सोमेश क्षीरसागर यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी शरद पवार यांची भेट घेऊन केली आहे, असे नागनाथ क्षीरसागर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com