Loksabha Election 2024 : कोल्हापूर, हातकणंगले शिंदे गटाकडे? विद्यमानांचा होणार पत्ता कट

Kolhapur, Hatkanangle Constituency : विद्यमान खासदाराबाबत असलेली नाराजी आणि त्यातून निर्माण झालेली पराभवाची सावली याला हटवण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी कंबर कसली आहे.
Dhairyashil Mane And Sanjay Mandlik
Dhairyashil Mane And Sanjay MandlikSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : महाविकास आघाडीची कोल्हापूर लोकसभेची रणनीती जवळपास निश्चित झाली असली तरी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकासची भूमिका अजूनही अधांतरीत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ही जागा सोडण्यात येत असली तरी राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत जाण्यास नकार दर्शवला आहे.

एकीकडे महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होत नसताना दुसरीकडे महायुतीने ताकही फुंकून प्यायला सुरवात केली आहे. कोल्हापूर व हातकणंगलेच्या विद्यमान खासदाराबाबत असलेली नाराजी आणि त्यातून निर्माण झालेली पराभवाची सावली याला हटवण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. दोन्ही विद्यमान खासदारांचा पत्ता कट करून त्याठिकाणी धनुष्यबाणावर भाजप (BJP) च्या उमेदवारांना निवडणूक लढवण्याचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे.

राज्यातील जे तेरा खासदार भाजपसोबत युतीत आहेत त्या जागांवर मुख्यमंत्री शिंदे गटाने दावा केला आहे. त्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. या विद्यमान जागांवर शिंदे गटाचे खासदार असले तरी जनसंपर्क आणि विकासकामावरून नाराजी आहे. ही नाराजी विद्यमान खासदारांना भोवण्याची शक्यता आहे.

स्वतः संजय मंडलिक मीच तगडा उमेदवार असल्याचे सांगत असले तरी भाजपने मात्र आपले फासे टाकायला सुरवात केली आहे. भाजपकडून सुरु असलेल्या प्रयत्नामुळे दोन्ही विद्यमान खासदारांची नाराजी वाढली आहे. भाजप जिंकेल त्यालाच उमेदवारी या तत्वाने जात आहे. तर शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या चर्चेनुसार 'उमेदवार आमचा, पक्ष तुमचा' हा प्रस्ताव शिंदे गटापुढे ठेवल्याची माहिती आहे.

Dhairyashil Mane And Sanjay Mandlik
Nitish Kumar News : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत नितीश कुमार ब्रिटन दौऱ्यावर

कोल्हापूरसाठी महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांचे नावे समोर आल्यानंतर भाजपकडून समरजितसिंह घाटगे यांचे नाव समोर आले. गेल्या दीड महिन्यापासून या नावाची कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. घाटगे यांची या प्रश्नावर दिल्लीवारी देखील झाल्याचे समजते.

त्यामुळे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचा पत्ता कट होणार का नाही? यासाठी आणखी दोन दिवसांची वाट पहावी लागेल. महाविकास आघाडीकडून हातकणंगलेत शिवसेनेच्या कोट्यातून स्वाभिमानीला ही जागा देण्याचे नियोजन आहे. मात्र राजू शेट्टी यांनी नकार दिला आहे. प्रसंगी उमेदवार आणि पाठिंबा न देता शेट्टी यांना महाविकास आघाडीकडून बळ देण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्याबाबत असलेल्या नाराजीमुळे विजयाची खात्री भाजपला नाही. त्यामुळे माने ऐवजी आमदार विनय कोरे यांच्या नावाची चाचपणी सुरु आहे. विनय कोरे जनसुराज्य पक्षाचे आमदार असले तरी त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यांची मतदारसंघासह पंचक्रोशीत लोकांच्या मनावर पकड घट्ट आहे. त्यामुळे शेट्टी यांच्या विरोधात ते सक्षम उमेदवार असू शकतात.

(Edited by Amol Sutar)

Dhairyashil Mane And Sanjay Mandlik
Lok Sabha Election 2024 : सुजात आंबेडकर यांना उमेदवारीसाठी अमरावतीत ठराव

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com