Lok Sabha Election 2024 : भाजपच्या धक्कातंत्राची धास्ती अन् विद्यमान खासदार झाले जागे; थेट शाहांचा शब्द घेऊन मंडलिक मैदानात ?

MP Sanjay Mandlik and Amit Shah : भाजपकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर खासदार मंडलिक यांनी शाह यांची भेट घेतली.
Amit Shah and MP Sanjay Mandlik
Amit Shah and MP Sanjay MandlikSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News: भाजपने निर्माण केलेली धास्ती पचवता न आल्याने अखेर शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांनी थेट अमित शाह यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. भाजपकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर खासदार मंडलिक यांनी शाह यांची भेट घेतली. उमेदवारीचा शब्द घेऊन मतदारसंघात आल्यानंतर त्यांनी थेट प्रचाराला सुरुवात केली आहे. (Lok Sabha Election 2024)

तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या सभेने हातकणंगले व कोल्हापूरचे विद्यमान खासदार कामाला लागले आहेत. सध्या उमेदवारी कोणाला द्यायची, यावर चर्चा नसली तरी दोन्ही खासदारांनी पायाला भिंगरी बांधली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amit Shah and MP Sanjay Mandlik
Lok Sabha Election 2024 : ‘मी आता कुणाच्याच पंगतीला बसणार नाही; लोकसभेचे मैदान शेतकऱ्यांच्या जिवावर मारणार’

शिंदे गटात प्रवेश करताना खासदार मंडलिक व धैर्यशील माने यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचा शब्द देण्यात आला असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर दोन्ही विद्यमान खासदारांनी महायुतीत सामील हाेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

आगामी लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली. तसतसे भाजपनेदेखील कोल्हापूर किंवा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या एका जागेवर दावा केला आहे. भाजपने दोनपैकी एका जागेवर दावा करण्यास सुरुवात केल्याने दोन्ही विद्यमान खासदारांच्या उमेदवारीविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

भाजपकडे कोल्हापूर, की हातकणंगले जाणार याचाही निर्णय झाला नाही, पण शिंदे गटाच्या दोन्ही विद्यमान खासदारांविषयी नाराजी असल्याचा सर्वेक्षणाचा अहवाल असल्याचे बोलले जात आहे होते. यामुळे उमेदवारी बदलण्याविषयी चर्चा सुरू झाली आहे. त्यातूनच शौमिका महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, समरजित घाटगे यांची नावे पुढ़े येत आहेत. या सर्व चर्चेमुळे खासदार मंडलिकांना उमेदवारी मिळणार नाही, अशा चर्चेने वेग धरला होता. शिवाय हातकणंगलेतदेखील माने वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते.

एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झालेली रेकॉर्ड ब्रेक सभा आणि त्या सभेला मिळालेल्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यामुळे दोन्ही विद्यमान आमदारांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत, तर या सर्व पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात खासदार मंडलिकांनी थेट अहमदाबाद गाठले. केंद्रीय मंत्री शाह यांची भेट घेत शिंदे गटात प्रवेश करताना दिलेल्या शब्दांची आठवण करून दिली.

केंद्रीय मंत्री शाह यांच्या भेटीनंतर खासदार मंडलिक आणखी चार्ज झाल्याचे दिसते. एकीकडे मुख्यमंत्री शिंदेंचा मेळावा आणि दुसरीकडे मंत्री शाहांची भेट घेतल्यानंतर खासदार मंडलिक वेगाने कामाला लागलेत. रोज दहा ते बीस गावांचा संपर्कही सुरू केला असून, विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कुणीही असो, महायुतीची उमेदवारी आपल्यालाच मिळणार, याची त्यांना खात्री झाल्यानेच त्यांनी प्रचाराचा नारळ फोडल्याचे समजते, तर दुसरीकडे खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जवळीक साधून खासदार धैर्यशील माने यांनीदेखील विविध कामांच्या उद्घाटन दौऱ्याला सुरुवात केली आहे.

दरम्यान, गेल्या पाच वर्षांपासून मतदारसंघात कमी असणारा जनसंपर्क आणि शिंदे गटात गेल्याने या दोन्ही विद्यमान खासदारांविषयी मतदारसंघात नाराजी आहे. त्यातूनच भाजपच्या अंतर्गतही नाराजी असल्याचे सांगितले जाते. मात्र, अद्याप महायुतीत जागावाटपाबाबत चर्चा झालेली नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजप या दोन्ही ठिकाणी तगडा उमेदवार देण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Amit Shah and MP Sanjay Mandlik
Mahavikas Aghadi News : महाविकास आघाडीच्या बैठकीची तारीख बदला, 'वंचित'चं पुन्हा दबावतंत्र !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com