Madha Lok Sabha constituency : माढा लोकसभेसाठी मीही इच्छूक होतो; भाजपच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली 'मन की बात'

Prashant Paricharak News : माढ्यातून निवडणूक लढविण्यासाठी मी इच्छूक होतो. तशी तयारीही मी केली होती. मात्र, पक्षाकडून कोणतेही निर्देश मला लोकसभा निवडणुकीसंदर्भात देण्यात आले नाहीत आणि मीही पक्षाकडे लोकसभा उमेदवारीची मागणी केली नाही.
Prashant Paricharak
Prashant Paricharak Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 24 March : माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची ऑफर मला काही नेत्यांनी दिली होती. त्या दृष्टीने मी तयारीही केली होती. मात्र, भारतीय जनता पक्षाकडून कोणतीही सूचना न आली नाही. तसेच आपण पक्षाकडे उमेदवारीही मागितली नाही, असे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी स्पष्ट केले.

माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha constituency ) उमेदवारीवरून महायुतीमध्ये (Mahayuti) पेच निर्माण झाल्यानंतर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे यांनी मला लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी ऑफर केली होती. त्यामुळे माढ्यातून निवडणूक लढविण्यासाठी मी इच्छूक होतो. तशी तयारीही मी केली होती. मात्र, पक्षाकडून कोणतेही निर्देश मला लोकसभा निवडणुकीसंदर्भात देण्यात आले नाहीत आणि मीही पक्षाकडे लोकसभा उमेदवारीची मागणी केली नाही, असे स्पष्टीकरण माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी, माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांनी दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prashant Paricharak
NCP Manifesto Committee : लोकसभेसाठी राष्ट्रवादीची जाहीरनामा समिती जाहीर; वळसे पाटलांकडे अध्यक्षपदाची धुरा

भारतीय जनता पक्षाने सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवार निवडण्यासाठी अत्यंत मायक्रो प्लॅनिंग केले आहे. त्यातूनच माढ्यातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाठी चाचपणी सुरू आहे, असेही परिचारक यांनी स्पष्ट केले.

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठीही मी इच्छुक होतो; परंतु त्या वेळी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने आपल्याला थांबण्याची सूचना केली होती. त्यानंतर आपण पोटनिवडणुकीसाठी थांबलो होतो, याची आठवणही परिचारक यांनी पुन्हा करून दिली आहे. मात्र, लोकसभेच्या दृष्टीने पक्षाने आपल्याला कोणतीही सूचना केलेली नाही.

Prashant Paricharak
Mahavikas Aghadi News : पक्ष अन्‌ नेत्यांवरील राग उमेदवारावर काढू नका; महाआघाडीच्या नेत्यांचा कार्यकर्त्यांना सल्ला

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यातच परिचारक यांनीही आपण इच्छूक होतो, हे स्पष्ट केले आहे. मोदी सरकारची विकासाची धोरणे आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणाऱ्या योजना यामुळे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही परिचारक यांनी व्यक्त केला.

माजी आमदार परिचारक म्हणाले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही अनेक विकास कामे केली आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून पुन्हा उमेदवारी दिली आहे, तसेच मतदारही त्यांच्या कामावर खूश आहेत, त्यामुळे खासदार निंबाळकर यांचा विजय निश्चित आहे.

Prashant Paricharak
Solapur BJP : लोकसभेसाठी उमेदवार तयार करण्याचा दूरदृष्टीपणा सोलापूर भाजपने का गमावला?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com