MNS News: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, राज ठाकरेंना धक्का; मनसेच्या विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांना अटक

Mumbai MNS Leader: मनसे नेते गणेश चुक्कल यांच्याविरोधात यापूर्वीही मुंबई पोलिसांत आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या बहिणीच्या कंपनीनेच चुक्कल यांना अडचणीत आणलं होतं.
Raj Thackeray
Raj Thackeraysarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News: एकीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत विराट मोर्चा काढला आहे. या मोर्चासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेकडून जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, या मोर्चाआधीच मुंबई पोलिसांनी मनसेच्या बड्या नेत्याविरोधात मोठी कारवाई केली आहे.

मुंबईतील पवई पोलिसांनी शुक्रवारी(ता.2 ऑक्टोबर)मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांना अटक केली आहे. यामुळे मनसेच्या गोटात खळबळ उडाली आहे. चुक्कल यांच्याविरोधात हिरानंदानीतील विकासकाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चुक्कल यांच्यावर 2023 मध्ये गुन्हा दाखल झाला होता.

हिरानंदानी विकासकाने गणेश चुक्कल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चुक्कल यांच्याविरोधात फसवणूक आणि खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. याच आरोपानंतर विकासकानं पोलिस ठाण्यात धाव घेत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. शुक्रवारी त्यांच्याविरोधात कारवाई करत पोलिसांनी त्यांना अटक केली. सध्या त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

मनसे नेते गणेश चुक्कल यांच्याविरोधात यापूर्वीही मुंबई पोलिसांत आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या बहिणीच्या कंपनीनेच चुक्कल यांना अडचणीत आणलं होतं. त्यांच्या कंपनीने मनसे नेत्याविरोधात २०२२ मध्ये दिलेल्या फसवणुकीची तक्रार दाखल करत गुन्हाही दाखल झाला होता.

Raj Thackeray
Pradeep Purnekar murder case : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण : आधी दोन तरुणांसोबत सापडली, नंतर ऑफिसबाहेर दिसली; ‘त्या’ तरुणीवर कुटुंबीयांचा संशय

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे मुंबईतील घाटकोपर पश्चिम येथील विभाग अध्यक्ष आणि राजकीय नेते गणेश चुक्कल राहिले आहेत. ते घाटकोपरमधील मोठ्या आणि वेगवेगळ्या थीमवर आधारित दहीहंडी उत्सवामुळे चर्चेत आले होते. त्यांना पवई पोलिसांनी चुक्कल यांना अटक केली आहे. तसेच ते विक्रोळीतील गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अग्निशामक दलाच्या सलामीवरून निर्माण झालेल्या विवादातही ते चर्चेत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Maharashtra Live Politics Update
Pune Municipal Corporations
Maharashtra Live Politics Update
Ganesh Bidkar Amol Balwadkar .jpg
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com