Rajaram Sugar Factory : राजाराम कारखान्यावर पुन्हा महाडिकांची एकहाती सत्ता; सतेज पाटलांना धोबीपछाड

Rajaram Sugar Factory Election Result Kolhapur : महाडिक गटाने सर्व जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे
Satej Patil, Mahadevarao Mahadik
Satej Patil, Mahadevarao MahadikSarkarnama
Published on
Updated on

Rajaram Sugar Factory Election Result : कोल्हापुरातील (Kolhapur) अटितटीच्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना ( Chhtrapati Rajaram Sugar Factory Election Result) निवडणुकीची मतमोजणी कोल्हापूरमधील रमणमळा शासकीय गोदामात झाली. यामध्ये निवडणुकीमध्ये महाडिक गटाने सर्व जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे.

राजाराम कारखान्याच्या निवडणुकीकडे अवघ्या कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. या निवडणुकीत महाडिक गटाने पुन्हा एकदा बाजी मारत सत्ता अबाधित राखली आहे. महाडिक गटाने कारखान्याच्या सर्वच्या सर्व 21 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे सतेज पाटील यांना पुन्हा एकदा राजाराम कारखान्याने हुलकावणी दिली आहे.

Satej Patil, Mahadevarao Mahadik
Kolhapur News : महादेवराव महाडिकांसह तीन जणांचा विजय; इतरांची मोठी आघाडी : सतेज पाटलांना धक्का...

निवडणुकीमध्ये कंडका पाडायचाच या स्लोगनने प्रचारामध्ये उतरलेल्या सतेज पाटलांचा (Satej Patil) महाडिक आघाडीने धुव्वा उडवला. सर्वच्या सर्व जागांवर महाडिक विजयी झाले आहेत. ज्या ताकदीने विरोधी आघाडीकडून प्रचार करण्यात आला होता, त्यामुळे महाडिकांच्या सत्तेला सुरूंग लागतो की काय? अशी शंका कोल्हापूरत वर्तविण्यात येत होती. मात्र, पुन्हा एकदा सभासदांनी सत्ताधाऱ्यांवर विश्वास दाखवला.

त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सलग निवडणूक जिंकलेल्या पाटील यांना दारुण पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर महाडिक आघाडीने सुरुवातीपासून घेतलेली घेतली होती. पहिल्या फेरीमध्ये जवळपास 800 ते 1000 मतांनी सर्वच उमेदवार आघाडीवर होते. तिच परिस्थिती दुसऱ्या फेरीत आणि नंतरच्या फेऱ्यांमध्ये दिसून आली.

Satej Patil, Mahadevarao Mahadik
kolhapur News : विजयाचा गुलाल उधळताच महादेवराव महाडिकांचा सतेज पाटलांना इशारा; राजकारणाला वेगळी दिशा मिळणार...

आमदार विनायक कोरे, माने गट आवाडे गट यांचेही बळ सत्ताधारी महाडिक गटाला मिळाले. महादेवराव महाडिक यांनी त्यांचे आभार मानले. या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाल्या होत्या. मात्र, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर 29 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्यामुळे या निवडणुकीने टोक गाठले होते.

या निवडणुकीमध्ये काय होते? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र, आता या निवडणुकीमध्ये महाडिक गटाने एकहाती सत्ता मिळवली आहे. विजय निश्चित झाल्यानंतर सत्ताधारी आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार अमल महाडिक तसेच खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषद घेत सतेज पाटील यांच्यावर कडाडून हल्ला चढवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com