

भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी सांगली लोकसभा तिकीट विक्रीचा गंभीर आरोप केला.
काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी या आरोपांना मिश्किल शैलीत उत्तर देत पडळकरांची तुलना डोनाल्ड ट्रम्पशी केली.
या प्रकरणामुळे सांगली जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Sangli News : सांगली जिल्ह्यातील राजकारण भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्या गौप्यस्फोट आणि राजकीय खेळीमुळे चांगलेच तापलेलं आहे. अशातच आता पलूस-कडेगावचे आमदार विश्वजित कदम यांनी देखील मिश्किल उत्तर दिल्याने ते आणखी तापण्याची शक्यता आहे. नुकताच पडळकर यांनी “विशाल पाटलांना तिकीट मिळणार नव्हतंच!” विशाल पाटलांचा विश्वजीत कदम आणि जयंत पाटलांनी ठरवून गेम केला, असा मोठा गौप्यस्फोट केला होता. या आरोपाला विश्वजीत कदम यांनी मिश्किल शैलीत उत्तर देताना “पडळकर म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेव्हलचे नेते आहेत”, असा सणसणीत टोला हाणला आहे.
ते पलूस तालुक्यातील नागठाणे येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांना पत्रकारांनी पडळकर यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले. त्यावर अतिशय वेगळ्या आणि मिश्किल शैलीत दोन्ही हात जोडत चेहऱ्यावर मिश्किल हास्य आणत उत्तर देत टोला लगावला. ज्याची सध्या जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली आहे. आज
२०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, "विशाल पाटील पुढचे खासदार नसणार" असे विधान पडळकर यांनी याआधी केले होते. तर जतचे अध्यक्षपद घालवणाऱ्यांचा 'कार्यक्रम' होणार असल्याचा इशाराही दिला होता. तसेच पडळकर यांनी महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील नेते विश्वजीत कदम आणि जयंत पाटलांवर जोरदार निशाना साधला होता. या दोघांनी मिळून विशाल पाटलांचा ठरवून गेम केला, असा आरोप केला होता.
तसेच पडळकर यांनी, काँग्रेसकडून विशाल पाटील यांना खासदारकीचे तिकीट मिळणार नाही, हे निश्चित होते. तर ज्याची माहिती आधीच जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांना होती. पण या दोघांनी स्टंट केला. मात्र विशाल पाटील थांबले नाहीत. त्यांनी आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केली. ज्यामुळे मनाने नाही, तर शरीराने जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांना विशाल पाटलांसोबत राहावं लागलं, असा खळबळजनक गौप्यस्फोट पडळकर यांनी केला.
"पडळकर हे खूप महान नेते आहेत. ते थेट 'डोनाल्ड ट्रम्प' यांच्या लेव्हलचे नेते असून आम्ही भारतात आणि महाराष्ट्रात राहणारे छोटे लोक आहोत. यामुळे त्यांच्या लेव्हलला जाऊन आम्ही बोलू शकत नाही. तर माझ्या भीतीपोटी जयंत पाटील, विश्वजीत कदम आणि विशाल पाटील एकत्र आले आहेत. त्यांना जास्तीचे ज्ञान नाही, अशी केलेल्या बोचऱ्या टीकेलाही त्यांनी दोन्ही हात जोडून शांत उत्तर दिले. विश्वजीत कदम यांनी, पडळकरांना थेट अमेरिकेच्या अध्यक्षांची उपमा देत हा विषय संपवला...
1. गोपीचंद पडळकर यांनी काय आरोप केला होता?
त्यांनी सांगली लोकसभा निवडणुकीत तिकीट विक्री झाल्याचा आरोप केला होता.
2. विश्वजित कदम यांनी काय उत्तर दिले?
कदम यांनी मिश्किल शैलीत प्रत्युत्तर देत पडळकरांची तुलना डोनाल्ड ट्रम्पशी केली.
3. या वादात जयंत पाटील यांचा उल्लेख का झाला?
पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावरही तिकीट विक्रीचा आरोप केला होता.
4. हा वाद कोणत्या निवडणुकीशी संबंधित आहे?
हा वाद सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे.
5. या प्रकरणाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
या वादामुळे स्थानिक राजकारण तापण्याची शक्यता असून निवडणूक प्रचारावर परिणाम होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.