Hasan Mushrif : महायुतीत अंतर्गत वाद उफाळला! गोकुळमध्येही राजकीय संघर्ष? मुश्रीफांनी पराभवाचे खापर भाजपवर फोडले, मुलाच्या अध्यक्षपदावरही भाष्य

Hasan Mushrif Blames BJP for Gokul Election Defeat : राज्यात नुकताच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीवरून महायुतीत वादाची ठिकणगी पडली असून आता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत वाद होताना दिसत आहे.
Mahayuti Internal Conflict; Devendra Fadnavis And Hasan Mushrif
Mahayuti Internal Conflict; Devendra Fadnavis And Hasan MushrifSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालावरून नवा वाद सुरू झाला असून, महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निकालावरून हा वाद सुरू झाला आहे. यावरून भाजप आणि शिवसेना आमने-सामने आले असून, शिवसेनेने केसाने गळा कापल्याचा आरोप भाजपने केला आहे.

या आरोप-प्रत्यारोपांमुळे पुन्हा एकदा महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. त्यातच गोकुळमध्येही महायुतीतील वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळमधील पराभवाचे खापर भाजपवर फोडले आहे. ते नंदुरबार येथे बोलत होते.

बुधवारी (ता. 28) रात्री राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या तीन जागा महाविकास आघाडीने जिंकल्या, तर दोन जागा महायुतीच्या वाट्याला आल्या. दरम्यान, मित्रपक्षाची साथ न मिळाल्यामुळे महायुतीला फटका बसल्याचा ठपका भाजपने शिवसेनेवर ठेवला आहे.

Mahayuti Internal Conflict; Devendra Fadnavis And Hasan Mushrif
Hasan Mushrif VS Satej Patil : 'त्यांनी रडत बसू नये, त्यांचे शपथ घेतलेले फोटो माझ्याकडे', मंत्री मुश्रीफांचा सतेज पाटलांवर पलटवार

शिवसेनेच्या भूमिकेमुळे महायुतीचा पराभव झाल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. तसेच पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमधील पदवीधर मतदारसंघांच्या जागांवरून त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पुण्यात माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर कारवाई करणार का, असा थेट सवालही त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. शिवसेनेने केसाने गळा कापल्याचा आरोपही बन यांनी केला आहे. बन यांच्या या आरोपांमुळे राज्यातील महायुतीत मोठी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन्ही पक्षांतील नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत.

अशातच आता कोल्हापुरातही महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून बोलताना पराभवाचे खापर भाजपवर फोडले आहे. भाजपसोबतच्या वादामुळे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत पराभव झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. निवडणुकीच्या वेळी भाजपसोबतचा वाद मिटला नाही, त्यामुळे 13 आणि 12 असा निकाल लागला, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

याचवेळी गोकुळच्या नव्या अध्यक्षपदाबाबत संकेत देताना मुश्रीफ म्हणाले की, अध्यक्षपदाचे उमेदवार शशिकांत पाटील आहेत. बंटी पाटील त्यांना अध्यक्ष करणार होते. मात्र, आता शशिकांत पाटील-चुयेकर यांना भविष्यात अध्यक्ष बनवण्याची जबाबदारी आम्हालाच पार पाडावी लागेल, असे सूतोवाच त्यांनी केले.

Mahayuti Internal Conflict; Devendra Fadnavis And Hasan Mushrif
Hasan Mushrif: मंत्री मुश्रीफांचा ताफा कर्नाटकात अडवला, नेमकं काय घडलं?

गेल्या वेळी आपल्या मुलाला अध्यक्ष का बनवावे लागले, याबाबतही त्यांनी भाष्य केले. युतीच्या दबावामुळे मुलाला अध्यक्ष करावे लागल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. आता मुश्रीफ यांच्या या विधानामुळे गोकुळच्या राजकारणासह महायुतीतील दबावाच्या राजकारणाची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. राज्यात महायुतीतील घटक पक्षांमध्ये विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com