Mangalwedha News : संकेतस्थळ बंद पडले; निवडणूक आयोगाने दखल घेत उमेदवारांना दिला वेळ वाढवून

Mangalwedha Taluka Gram Panchayat News : ग्रामपंचायत निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने दखल घेतली आणि उमेदवारांना दिलासा मिळाला.
Gram Panchayat Election News
Gram Panchayat Election NewsSarkarnama
Published on
Updated on

Mangalwedha Solapur News : तालुक्यातील २७ ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी आजपासून सुरू झाली असताना पहिल्याच दिवशी निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ बंद असल्यामुळे अनेक इच्छुकांची निराशा झाली. हे वृत्त राज्यात सर्वात आधी 'सरकारनामा'ने प्रसिद्ध केले. राज्य निवडणूक आयोगाने याची दखल घेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी २.३० तासाने वाढवला. मंगळवेढ्यात आज दुसऱ्या दिवशी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला.

Gram Panchayat Election News
Telangana Election 2023 : तेलंगणा निवडणूक प्रचाराच्या रणांगणात 'नगरी नेता'; पक्षांतर्गत प्रस्थापितांना आव्हान

तालुक्यातील आंधळगाव, नंदूर, लक्ष्मी दहिवडी, खुपसंगी, रड्डे, खडकी, बठाण, मुंढेवाडी, हिवरगाव, महमदाबाद हु, अकोला, शेलेवाडी, डिकसळ, जालीहाळ, लोणार, मानेवाडी, शिरसी, जंगलगी, रेवेवाडी, पडोळकरवाडी, देगाव, उचेठाण, निंबोणी, चिक्कलगी, जुनोनी, ब्रम्हपुरी, भाळवणी, तर बालाजीनगर या एकमेव ग्रामपंचायतची पोटनिवडणूक होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्य निवडणूक आयोगाने गेली अनेक वर्षे ग्रामपंचायती निवडणुका लांबणीवर टाकल्यामुळे अनेक इच्छुकांना मतदारांची मन धरणी करताना नाकीनऊ येऊ लागले. ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामध्ये १६ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर या पाच दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी कमी असून, हे संकेतस्थळ बंद असल्यामुळे अनेक इच्छुकांची पहिल्या दिवशी निराशा झाली. याबाबतचे वृत्त सगळ्यात आधी 'सरकारनामा'ने प्रसिद्ध केले होते. सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. याची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी तोच ठेवत सकाळी ११ ते ३ हा पूर्वीचा कालावधी निश्चित केला होता. हा कालावधी २.३० तासाने वाढवून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत निश्चित केला. तशी अधिसूचना के. सूर्यकृष्णमूर्ती उपसचिव राज्य निवडणूक आयोग यांनी प्रसिद्ध केली. दरम्यान, आज मंगळवेढ्यात २७ ग्रामपंचायतींमध्ये अकोला या ग्रामपंचायतीसाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली.

Edited by Sachin Fulpagare

Gram Panchayat Election News
Mangalwedha News : मंगळवेढ्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू; पहिल्याच दिवशी वेबसाइटचा 'खोडा'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com