BMC elections : मुंबईत जागावाटपाची कोंडी फुटली! असा असणार महायुतीचा फॉर्म्युला; बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने उचलले मोठे पाऊल

Mahayuti seat sharing formula News : भाजपने बंडखोरी टाळण्यासाठी सावधगिरीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजप उमेदवारांची यादी आता सोमवारी जाहीर होणार असल्याचे समजते.
EKnath shinde, Devendra Fadnavis
EKnath shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राज ठाकरेंच्या मनसेने युतीची घोषणा केली आहे. त्यामुळे आता महायुतीदेखील पूर्ण तयारीने रिंगणात उतरली आहे. गेल्या काही दिवसापासून महायुतीमधील भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची जागावाटपाबाबत चर्चा सुरु होती. ही चर्चेची कोंडी फुटली आहे. त्यामुळे जवळपास महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यातच आता भाजपने बंडखोरी टाळण्यासाठी सावधगिरीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजप उमेदवारांची यादी आता सोमवारी जाहीर होणार असल्याचे समजते.

मुंबई महापालिका निवडणूकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी भाजप 140 आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना 87 जागा लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. या महापालिकेमध्ये महायुतीतील अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना मिळून 227 जागा लढवणार आहेत. याबाबत महायुतीकडून घोषणा कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

EKnath shinde, Devendra Fadnavis
BJP Rebel Fear : भाजपला सतावतेय बंडखोरीची भीती, बाहेरून आलेल्या उमेदवारांमुळे निष्ठावंतांमध्ये खदखद!

महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकीत भाजपने मुंबईत शिंदे यांच्या शिवसेनेसाठी फक्त 52 जागा सोडण्याची तयारी दाखवली होती. मात्र, ठाकरे बंधूंच्या युतीनंतर भाजपने आता शिवसेनेला जास्त जागा देऊ केल्या आहेत. मात्र, महायुतीची घोषणा कधी होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

EKnath shinde, Devendra Fadnavis
Shivsena Politics : ऐन निवडणुकीपूर्वीच एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात हायहोल्टेज ड्रामा! पक्षातून कार्यकर्त्याची हकालपट्टी करताच माजी महापौरांनी दिला राजीनामा

महायुतीबाबत जवळपास दोन्ही पक्षात आतापर्यंत चार बैठका पार पडल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे चार दिवस शिल्लक असताना आता दोन्ही पक्षातील फॉर्म्युला जवळपास ठरला आहे. त्यानुसार आता भाजप 140 आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना 87 जागा लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे घोषणा कधी केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

EKnath shinde, Devendra Fadnavis
NCP News : पुण्यानंतर आता ठाण्यात दोन राष्ट्रवादींची 'दिलजमाई'; एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढणार?

राज्यातील मुंबईसह एकूण 29 महापालिकांमध्ये 15 जानेवारीला मतदान होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. मुंबई महानगरपालिकेची मागील निवडणूक 2017 रोजी झाली होती. यावेळी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर महापौर म्हणून कार्यरत होत्या.

EKnath shinde, Devendra Fadnavis
Prashant Jagtap : काँग्रेसच्या वाटेवर असलेल्या प्रशांत जगतापांना उद्धव ठाकरेंचा फोन, शिवसेनेच्या ऑफरवर म्हणाले, '2 ते 3 तासांत भाजपला आव्हान देणाऱ्या पक्षातच...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com