Dhangar Reservation Agitation : धनगर आरक्षण उपोषणाच्या मंचावर दोन नेत्यांमध्ये बाचाबाची

Pandharpur News : हे समाजाचे आंदोलन आहे. कोणा एकाचे नाही, असे म्हणत माऊली हळणवर यांची शेलक्या शब्दांत हजेरी घेतली. या वेळी दोघांमध्ये बराचवेळ शाब्दिक बाचाबाची सुरू होती.
Pandharpur Dhangar Agitation
Pandharpur Dhangar Agitation Sarkarnama
Published on
Updated on

Pandharpur, 16 September : एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी धनगर समाज बांधव गेल्या सात दिवसांपासून पंढरपूरमध्ये उपोषणाला बसले आहेत. उपोषण आंदोलनाच्या सातव्या दिवशी मंचावर धनगर समाजाच्या दोन नेत्यांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. भर मंडपात दोन नेत्यांमध्ये वादावादी झाल्याने काही वेळ गोंधळ उडाला होता.

उपोषणकर्ते माऊली हळणवर आणि धनगर समाजाचे (Dhangar community) नेते शालिवाहन कोळेकर या दोन नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. शालिवाहन कोळेकर हे आज उपोषणाच्या मंचावर गेले होते. त्या वेळी उपोषणकर्ते माऊली हळणवर यांनी ‘कोळेकर यांना खाली उतरा,’ असे संयोजकांना सांगताच शालिवाहन कोळेकर चांगलेच संतप्त झाले.

हे समाजाचे आंदोलन आहे. कोणा एकाचे नाही, असे म्हणत माऊली हळणवर यांची शेलक्या शब्दांत हजेरी घेतली. या वेळी दोघांमध्ये बराचवेळ शाब्दिक बाचाबाची सुरू होती. यावेळी कोळेकर समर्थकांनीही गोंधळ घालत माऊली हळणवर यांच्यावर शाब्दिक हल्ला केला. भरमंडपात वादावादी (Dispute) झाल्याने काहीवेळ गोंधळ उडाला.

Pandharpur Dhangar Agitation
Sadabhau Khot : महाविकास आघाडीतील वळूंना अन्‌ रेड्यांना निवडणुकीत फोडून काढणार; सदाभाऊ कडाडले

दरम्यान, पहिल्या दिवसापासून धनगर समाज बांधवांच्या उपोषणस्थळी मानापान नाट्य रंगले आहे. पहिल्याच दिवशी उपोषणाला किती लोकांनी बसायचे, यावरून वाद झाला होता. त्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रविवारी भेटायला जाण्यासाठी नेमण्यात आलेल्या शिष्टमंडळातही मतभेद झाले होते.

दोन सदस्यांचा मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर बहिष्कार

शिष्टमंडळातील आदित्य फत्तेपूरकर आणि विठ्ठल पाटील या दोघांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवर बहिष्कार टाकून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन केले होते. मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाबरोबर चर्चा न करता पंढरपुरात येऊन आंदोलकांशी चर्चा करावी, अशी मागणी केली होती. या वेळी उपोषणस्थळी धनगर समाज बांधवांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. शिष्टमंडळातील दोन सदस्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकल्याने नव्या वादाला तोंड फुटले होते.

Pandharpur Dhangar Agitation
Daund Politics : दौंडला महायुतीत बिघाडी फिक्स; रमेश थोरातांनी पुन्हा दंड थोपटले!

पाच उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली

दरम्यान, उपोषण आंदोलनाच्या सहाव्या दिवशी रक्तातील साखर कमी झाल्यामुळे पाच उपोषकर्त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यातील योगेश धरम यांना चक्कर आल्याने ते जमिनीवर कोसळले होते. धरम यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com