Sarathi Students Protest: ऐन दिवाळीत 'सारथी'चे विद्यार्थी 18 दिवस रस्त्यावर; जरांगे पाटील घेणार भेट

Manoj Jarange : राज्य सरकारने 'सारथी'च्या 2023 च्या बॅचला सरसकट फेलोशिप मंजूर करावी, विद्यार्थ्यांची मागणी
Sarathi Students
Sarathi StudentsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: गेल्या 15 दिवसांपासून कोल्हापुरात सारथीच्या मुलांचे साखळी उपोषण सुरू आहे. ऐन दिवाळीत 18 दिवस ही मुलं रस्त्यावर असल्याने आतातरी राज्य सरकार याकडे लक्ष देणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे. राज्य सरकारने 'सारथी'च्या 2023 च्या बॅचला सरसकट फेलोशिप मंजूर करावी, या मागणीसाठी संशोधक विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू आहे. आजचा 18 वा दिवस आहे. शुक्रवारी मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील हे या विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत.

विद्यार्थ्यांनी साजरी केली काळी दिवाळी

गेल्या 18 दिवसांपासून आंदोलन सुरू असून, राज्य सरकार त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. ऐन दिवाळीत आम्हाला रस्त्यावर बसावे लागत आहे. अशी खंत विद्यार्थी बोलून दाखवत आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत माघार नाही, अशी भूमिका सारथी संशोधक विद्यार्थ्यांनी घेतली आहे. सरकार दाद घेत नसल्याने विद्यार्थ्यांनी काळी दिवाळी साजरी केली. काळे कपडे परिधान करून आंदोलनस्थळी काळी रांगोळी काढून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sarathi Students
Loksabha Election : हातकणंगलेतून माने गायब ? शेट्टी विरुद्ध आवाडे यांच्यातच फाइट

विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत ?

  1. 2023 मधील पात्र सारथी संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्यात यावी.

  2. सारथी संशोधक विद्यार्थ्यांना बार्टीप्रमाणे विद्यापीठ नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती देण्यात यावी.

  3. सारथीने संशोधक फेलोशिपची संख्या 50 न देता सरसकट विद्यार्थ्यांना द्यावी.

  4. सारथी प्रशासनाने सारथी कृती समितीच्या शिष्टमंडळाची मंत्र्यांबरोबर बैठक घडवून आणावी.

  5. संभाजीराजे छत्रपती व सतेज पाटलांकडून विद्यार्थ्यांची भेट

गेल्या 18 दिवसांपासून सारथीचे संशोधक विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. आतापर्यंत संभाजीराजे छत्रपती, आमदार सतेज पाटील यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे. आमदार सतेज पाटील यांनी मंत्रालयात मीटिंग लावण्याची ग्वाही दिली आहे, तर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी "मला मुख्यमंत्री करा, मी चुटकीत प्रश्न सोडवतो," असे सांगितले आहे.

Edited by : Ganesh Thombare

Sarathi Students
OBC Melava : 'तुम्ही तुमच्या हिशेबात राहा, ओबीसीला हिशेबात ठेवा'; ओबीसी नेत्याचा इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com