Maratha Reservation : ''पाहिजे त्याला आरक्षण द्या! पण...''; आरक्षणाच्या मागणीवर उदयनराजेंनी सुचवला 'हा' पर्याय

Udayanraje Bhosale : मनोज जरांगे पाटील यांनी साताऱ्यात उदयनराजेंच्या निवास्थांनी जाऊन त्यांची भेट घेतली.
Udayanraje Bhosale and Manoj Jarange
Udayanraje Bhosale and Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Satara News : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवरून राज्यात ओबीसी आणि मराठा यांच्यात वाद पेटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यावर शनिवारी खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यात जातीय जनगणना करावी आणि ज्याला गरज आहे त्याला आरक्षण द्यावे, असे मत व्यक्त केले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी साताऱ्यात उदयनराजेंच्या निवास्थांनी जाऊन भेट घेतली, त्यावेळी उदयनराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Udayanraje Bhosale and Manoj Jarange
Namdevrao Jadhav : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नामदेवराव जाधवांच्या तोंडाला फासलं काळं!

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात ते महाराष्ट्र दौरा करत आहेत. त्यानिमित्त आज त्यांनी सातारा येथे आशीर्वाद सभा घेतली. त्यानंतर त्यांनी जलमंदिर पॅलेस येथे जाऊन उदयनराजेंची भेट घेतली.

त्यावेळी उदयनराजेंनी इतर समाजाप्रमाणे मराठा समाजालाही आरक्षणाची गरज असल्याचे मत व्यक्त करताना, राज्यात आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्यासाठी जातीय जनगणना करण्याची गरज व्यक्त केली. सरकारने आधी सर्व जातींची जनगणना करावी आणि त्यानुसार सर्व जातींना आरक्षण द्यावे, असे मत व्यक्त केले.

मेरीटवर आरक्षण द्या -

मराठा समाजाच्या आरक्षणाची गरज का पडली? याबाबत बोलताना उदयनरराजे म्हणाले की, मराठा समाजावर अन्याय होत आला आहे. त्यामुळे आज त्यांना ही आंदोलन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने मेरीटवर आरक्षण द्यावे, त्यामुळे कोणावर अन्याय होणार नाही. शाळा, महाविद्याल, नोकरीसाठी गेल्यावर आरक्षणाची गरज भासत आहे. त्यामुळे मेरीटवर आरक्षण द्यावे किंवा जनगणना करून आरक्षण द्यावे. असेही उदयनराजे यावेळी म्हणाले.

Udayanraje Bhosale and Manoj Jarange
Devendra Fadnavis : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप ? शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस ? फडणवीसांच्या दाव्यानं खळबळ

मराठा समाजातील तरुणांनी विष खावे काय? -

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला विरोध करत मराठा विरुद्ध ओबीसी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर बोलताना उदयनराजे म्हणाले की, आज जाती-जातीत तेढ निर्माण केली जात आहे. ते कोण करतेय हे तुम्ही शोधा, मी कोणाविरुद्ध बोलणार नाही. मात्र, तुम्हाला मराठा समाजाचे प्रश्न सोडवायचे नसतील तर त्यांनी काय विष खाऊन मरायचे का? असा सवाल उदयनराजे यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांना केला आहे.

यासह त्यांनी पु्न्हा एकदा मेरीट, आर्थिक निकष आणि जणगणना करून गरजवंताना आरक्षण द्यावी अशी भूमिका स्पष्ट केली.

Udayanraje Bhosale and Manoj Jarange
MLA London Tour : राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर; १२ आमदार निघाले लंडन दौऱ्यावर!

मराठ्यांना आरक्षण मिळणार- जरांगे

ओबीसी आरक्षणामध्ये कुणबी म्हणून मराठा समाजाच्या नोंदींचे पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे सरकारला कायदेशीर मार्गाने मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागेल असे जरांगे म्हणाले. तसेच मराठा समाजाला 24 डिसेंबरला ओबीसीतूनच आरक्षण मिळणार असल्याचेही जरांगे यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला आरक्षण मिळत असल्यानेच ओबीसी नेत्यांकडून मराठा ओबीसी समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचेही जरांगे यावेळी म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com