Nagpur News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत बंडखोरी केली होती. शिंदे गटाने भाजपसोबत सत्ताही स्थापन केली. यानंतर वर्षभरातच राष्ट्रवादी काँग्रेसलाही सुरुंग लागला. अजित पवारांसह 40 आमदार शिंदे - फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. या दोन्ही पक्ष फोडण्यामागं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असल्याचे बोलले जात आहे. यानंतर तिसरा नंबर काँग्रेसचा असणार असल्याचेही चर्चा अधूनमधून जोर धरत असतानाच आता फडणवीसांनी पुन्हा एकदा नवा बॉम्ब टाकला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रात लवकरच काही नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याचे विधान केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा जोर धरू लागल्या होत्या.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याचदरम्यान आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लवकरच काँग्रेस नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचा दावा ऑफ दि रेकॉर्ड केला आहे. फडणवीस हे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत.
काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नेते आमच्या संपर्कात आहेत, त्यांना भाजपमध्ये यायचे आहे, पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी नो रूम अॅव्हेलेबल, हाऊसफुल असा बोर्ड लावला आहे. हा बोर्ड योग्यवेळी तो काढला जाईल, असा दावा सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
पटोले काय म्हणाले होते...?
काँग्रेस(Congress) नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये मोठे प्रवेश होणार असल्याचा दावा नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. "महाराष्ट्रातून मोठे प्रवेश होणार आहेत. राहुल गांधी यांची वेळ घेत ते प्रवेश होतील, प्रवेश कोणाचे आहेत ते तुम्हाला लवकरच समजेल," असे पटोले म्हणाले आहेत.
पटोले म्हणाले, आज केसी वेणुगोपाल आणि जयराम रमेश यांची भेट घेतली. नेहरू जयंती कार्यक्रमाला मी आलो होतो. ५ राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहे. याबाबत आज चर्चा झाली. आमची जोरदार तयारी झाली आहे. तसेच आगामी काळात महाराष्ट्रात काँग्रेस पक्षात मोठे प्रवेश होणार आहेत. यासाठी राहुल गांधी यांचा वेळ घेत आहोत. हे प्रवेश कुणाचे आहेत. हे तुम्हाला लवकर कळेल, असे ते म्हणाले होते.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.