Solapur MLC : राष्ट्रवादीचे वसंतनाना फुल्ल कॉन्फिडन्समध्ये : सत्ताधारी भाजपमध्ये प्रचंड नाराजी; अदृश्य शक्तीमुळे सोलापुरात चमत्कार घडणार

Vidhan Parishad Election 2026 : सोलापूर विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी मतदारांमधील नाराजीचा फायदा मिळेल आणि निकालात चमत्कार दिसेल, असा दावा महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांनी केला.
Vasantrao Deshmukh
Vasantrao DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 16 June : बिनविरोधच्या मार्गावर आलेली सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्या उमेदवारीमुळे रंगत आणली आहे. सत्ताधारी मतदारांमध्ये प्रचंड नाराजी असून त्या नाराजीचा लाभ मला नक्की होणार आहे. अदृश्य शक्तीही आमच्या सोबत असल्याने निकालात चमत्कार घडलेला दिसेल, असा दावा महाविकास आघाडीचे उमेदवार देशमुख यांनी केला आहे.

सोलापुरात महायुतीकडून बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख (Vasantrao Deshmukh) यांच्यात लढत होत आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी देशमुख यांच्यासाठी जोर लावला आहे, त्यांनी थेट पालकमंत्री जयकुमार गोरेंना आव्हान दिले आहे.

वसंतराव देशमुख म्हणाले, मी होम टू होम प्रचार केला असून ८० टक्क्यांहून अधिक मतदारांपर्यंत पोहोचलो आहे. अनेक मतदारांनी, ‘तुमची उमेदवारी असल्याने आम्हाला महत्त्व आले. तुम्ही निवडणुकीच्या मैदानात असल्याने पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) हे आमच्यापर्यंत आले,’ असे मत व्यक्त केले.

मतदारांना भेटल्यानंतर आणि त्यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. नाराज असलेल्या मतदारांनी मदतीचे आश्वासन दिल्याने अपेक्षेपेक्षा अधिक मतदान होईल आणि निकालावेळी चमत्कार घडेल, अशी भूमिकाही देशमुख यांनी मांडली.

Vasantrao Deshmukh
Vidhan Parishad Election : सांगली-साताऱ्यातील तिढा सुटला : शंभूराज देसाई म्हणाले, ‘मी त्यावर बोलणार नाही...’

देशमुख म्हणाले, सोलापूर विधान परिषद मतदारसंघातील ६१६ (एक मृत) मतदारांपैकी आम्ही ५०० ते ५५० मतदारांपर्यंत पोचलो आहे. माझ्या उमेदवारीचे सर्वच मतदारांनी स्वागत केले आहे. यात सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांनीही नाराजी व्यक्त करत मदत करणार असल्याचे सांगितले.

या मतदार भेटीदरम्यान सत्ताधारी गटाच्या अनेक सदस्यांमध्ये नाराजी असल्याचे जाणवले. मतदारांच्या या नाराजीचा लाभ आम्हाला नक्कीच निवडणुकीत होणार आहे. शिवाय अदृश्य शक्तीही आमच्या सोबत आहे, ती या निवडणुकीत चमत्कार घडून दाखवेल, असा दावाही देशमुख यांनी केला.

Vasantrao Deshmukh
Satara Shivsena : एकही मत इकडं-तिकडं जाणार नाही; पण आमच्या भावना शिंदेसाहेबांपर्यंत पोचवा : साताऱ्यातील शिवसेना सदस्य आक्रमक

क्रॉस व्होटिंग करू नका, मला ते कळते, असा इशारा आपल्याच नगरसेवकांना दिला आहे. त्याबाबत वसंतराव देशमुख म्हणाले, गुप्त मतदान पद्धतीत कोणी कोणाला मतदान केले, हे कळत नाही. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे कोणीही न घाबरता निर्भयपणे मतदान करावे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com