Jayant Patil Meet CM : मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीवर जयंत पाटलांचे भाष्य : ‘फडणवीसांसोबत भेट अन्‌ चर्चाही झाली; काही वेगळे प्रश्न असतात...’

Jayant Patil Solapur Tour : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकत्र प्रवास केला नसल्याचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. काही विशिष्ट प्रश्नांवर फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
Devendra Fadnavis- Jayant Patil
Devendra Fadnavis- Jayant Patil Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 15 October : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मी एकत्रित प्रवास केलेला नाही. आमच्यात चर्चा झाली. काही वेगळे प्रश्न असतात, त्यासाठी त्यांना काही वेगळी माहिती पाहिजे होती, त्यांनी ती घेतली, असे स्पष्टीकरण माजी मंत्री जयंत पाटील यांनी दिले.

शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील भूमिका आणि सद्यस्थिती याची माहिती देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमाशी बोलताना जयंत पाटील यांनी मुख्यमंंत्री फडणवीस यांच्या भेटीबाबत स्पष्टीकरण दिले.

जयंत पाटील म्हणाले, राज्य सरकारकडे कंत्राटदाराचे एक लाख कोटी रुपयांचा निधी थकीत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, रस्ते आदींसह सर्व कामाचे पैसे सरकारकडे अकडले आहेत. एकीकडे लोकांचे पैसे थकवायचे आणि दुसऱ्या बाजूला पाच, दहा टक्के पैसे घालून नवीन मोठे प्रकल्प सुरु करायचे. कंत्राट घेणं, कंत्राट वाटणं याच्या पलीकडे जर सरकार जाणार नसेल तर लोकांचा रोष ओढावून घेण्याचेच काम सरकार करत आहे.

दुष्काळ सुरू आहे त्यामुळे रस्त्यांपेक्षा दुष्काळाला कसं तोंड द्यायचं, याबाबतीत लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावं. गेली काही महिने आमचा शक्तीपीठच्या विरोधात लढा सुरू आहे. विरोधकांची भूमिका ऐकून घेण्यासाठी पाच मिनिटांचीसुद्धा वेळ सरकारने दिलेली नाही, त्यामुळे ही लोकशाही नाही तर हुकूमशाही सुरू झाली आहे, असा त्याचा अर्थ आहे. असेही पाटील यांनी सांगितले.

Devendra Fadnavis- Jayant Patil
Jayant Patil : शेतकऱ्यांना दुष्काळी मदत द्यायला पैसे नसतील तर शक्तीपीठसाठी कोठून पैसे आले? : जयंत पाटील

ते म्हणाले, साखरेचा प्रश्न अशा पद्धतीने हाताळला आहे की, साखरेचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होतं आहेत. सर्वसामान्यांचं पूर्वी 20 हजार रुपयांत घर भागायचं ते आता 40 हजार रुपयांच्या वर गेलं आहे.

ते म्हणाले, महागाई व दुष्काळाच्या तोंडावर सरकारकडून जे आर्थिक निर्णय झाले, त्यामुळे परदेशी गुंतवणूक परत गेली आहे. त्यामुळे देशासमोर नवीन आवाहने तयार झाली आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या निर्णय घेतले पाहिजे. आणि हा हट्ट जर कोणी एका व्यक्तीचा शक्तिपीठ महामार्ग करणारच असा असेल तर त्याने तो हट्ट बाजूला ठेवावेत. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गासारखी काम थांबवावे आणि दुष्काळाला कसं तोंड देता येईल याकडे सरकारने लक्ष द्यावे.

Devendra Fadnavis- Jayant Patil
Satara Dcc Bank : जयकुमार गोरेंनी अर्धी लढाई जिंकलीय; पण शेखर गोरेंनी शेवटच्या टप्प्यात डाव टाकला...

हा दुष्काळ यंदापुरता मर्यादित नाही. अल निनोचा परिणाम पुढची तीन चार वर्षे राहिला तर सर्वसामान्य आणि जनावरांना जगवणं यालाच प्राधान्य द्यावं लागणार आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com