Shivsena: ठाकरेंच्या वकिलांना फुल्ल कॉन्फिडन्स! सांगितलं शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' पक्षचिन्हाच्या वादाचा निकाल कधी लागणार...

Shivsena Party Symbol: शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' चिन्हावरील मालकीच्या वादावर सुप्रीम कोर्टात गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी पार पडली. उद्धव ठाकरे गटाच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला.
Supreme Court, Asim Sarode
Supreme Court, Asim SarodeSarkarnama
Published on
Updated on

Shivsena Hearing in Supreme Court: शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' चिन्हावरील मालकीच्या वादावर सुप्रीम कोर्टात गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी पार पडली. उद्धव ठाकरे गटाच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाने १७ फेब्रुवारी २०२३ रोजी दिलेल्या निर्णयानुसार शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्यात आले. हा निर्णय चुकीच्या निष्कर्षांवर आधारित असून, विधीमंडळ पक्षालाच राजकीय पक्ष मानण्याची भूमिका घटनाविरोधी असल्याचा दावा ठाकरे गटाने न्यायालयात केला आहे, त्या खटल्यामध्ये आज सुनावणी झाली.

Supreme Court, Asim Sarode
Walmik Karad: तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडच्या 'व्हीआयपी ट्रिटमेंट'वर बीड कारागृहाचा खुलासा! शहा, फडणवीसांकडे तक्रार झाल्यानंतर आली जाग

या सुनावणीनंतर ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला असीम सरोदे म्हणाले, "आजच्या सुनावणीत प्रामुख्याने 'धनुष्यबाण' चिन्हाच्या मालकीचा आणि राजकीय पक्षाच्या अधिकारांचा मुद्दा चर्चेत होता. राजकीय पक्ष हाच सर्वोच्च असून पक्षाच्या अधिकृत नेतृत्वालाच निर्णय घेण्याचा अधिकार असतो. केवळ आमदारांचा गट वेगळा झाला म्हणून तोच मूळ पक्ष असल्याचा दावा करता येत नाही, ही भूमिका आम्ही न्यायालयासमोर ठामपणे मांडली"

सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनीही राजकीय पक्षाला डावलता येणार नाही, असे स्पष्ट केल्याचा दावा सरोदे यांनी केला. तसेच राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोग यांसारख्या घटनात्मक संस्थांनी लोकशाहीची प्रतिष्ठा जपणे आवश्यक असल्याचे मत कपिल सिब्बल यांनी न्यायालयात मांडल्याचे त्यांनी सांगितले.

ठाकरे गटाने दहाव्या अनुसूचीनुसार पक्षांतरबंदी कायद्याचाही आधार घेतला. कोणतेही वैध विलीनीकरण न होता केवळ बहुमताच्या आधारे पक्षाचा ताबा देण्यास कायद्यात मान्यता नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. त्यामुळे बहुमताच्या आधारे शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या टिकू शकत नाही, असा दावा करण्यात आला.

Supreme Court, Asim Sarode
Abhijeet Dipke: 'क्या बोलती पब्लिक?' सप्टेंबरमध्ये सुरु होणार नवी चळवळ; कॉक्रोच जनता पार्टीची मोठी घोषणा

सरोदे यांनी पुढे सांगितले की, न्यायालयाच्या आजच्या प्रश्नांवरून आणि सुनावणीच्या दिशेवरून संविधानाच्या दृष्टीने हा मुद्दा अत्यंत स्पष्ट असल्याचे दिसून येते. "राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे वेगळे आहेत, हे न्यायालयाने मान्य केल्याचे आजच्या सुनावणीत स्पष्ट झाले," असा दावा त्यांनी केला.

पुढील सुनावणीत एकनाथ शिंदे गटाचे वकील आपली बाजू मांडणार आहेत. नियमित सुनावणी याच गतीने सुरू राहिल्यास पुढील महिनाभरात या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल येऊ शकतो, अशी शक्यता सरोदे यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com